आदर्श गाव राळेगण सिद्धी,हिवरे बाजारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गावांचा विकास होण्यासाठी शासन प्रयत्नशिल;आमदार लोकनेते निलेश लंके

निघोज ता.पारनेर)येथिल जगप्रसिद्ध कुंड रांजणखळगे परीसरात वृक्षारोफण करतांनाआमदार लोकनेते निलेश लंके,मळगंगा ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद,सरपंच ठकाराम लंके व अन्य.

निघोज रोख ठोक न्यूज :-
आदर्शगाव राळेगण सिद्धी,हिवरे बाजार गावाप्रमाणेच राज्यातील प्रत्येक गाव "आदर्श मॉडेल व्हीलेज' करण्यांसाठी राज्य शासन सर्वोतपरी प्रयत्न करणांर असल्यांचे प्रतिपादन आमदार लोकनेते निलेश लंके यांनी केले.
   सोमवार(दि.२२) रोजी निघोज(ता.पारनेर)येथे सरपंच ठकाराम लंके,राष्ट्रवादि काँग्रेस पार्टि,निलेश लंके प्रतिष्ठाण यांच्या सहकार्याने गावातील सर्व नागरीकांना होमिओपॕथिक औषधांचे वाटप तसेच जगप्रसिद्ध रांजण खळगे कुंड रस्त्याच्या दुतर्फा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व निघोज ग्रामपंचायतच्या माध्यमातून वृक्षारोफण करण्यांत आले यावेळी आमदार लंके बोलत होते.
  यावेळी बोलतांना आमदार निलेश लंके म्हणांलेआदर्शगाव राळेगण सिद्धी,हिवरे बाजारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक गावचा सर्वांगिन विकास होण्यांसाठी महाराष्ट्र शासन अशा गावच्या विकास कामांसाठी विशेष निधीची गरज ओळखून सरकारच्या सर्वच लोकोपयोगी योजना राबविण्यांसाठी खंबीरपणे उभे राहिल,तसेच विकास कामासाठी कोणत्याही गावांना निधीची कमतरता पडणार नाही,गावांच्या सुख सुविधासाठी प्राधान्यांने कोणता निधी मिळायला हवा,गावांमधील अडचणी,निधी मिळण्यांस येणाऱ्या अडथळ्यांबाबतही राज्य सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची टिम 'मास्टर प्लॅन' तयार करत असल्यांचे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले.
    यावेळी सरपंच ठकाराम लंके,मळगंगा ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद,निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद,व्हा.चेअरमन नामदेव थोरात, बबनराव ढवण,संदिप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ,सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब लामखडे, सोमनाथ वरखडे, बळवंत लंके,मेजर अमोल ठुबे,माजी.उपसभापती नानासाहेब वरखडे,मळगंगा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन रामदास लंके,भिवा रसाळ,दामु लंके,कॅप्टन विठ्ठल वराळ,शिवाजी वराळ,विश्वास शेटे,बबनभाऊ ससाणे,बबन तनपुरे,शंकर लामखडे,दत्तात्रय लाळगे,दत्तात्रय भुकन,सुनिल वराळ,बाळासाहेब लंके,संदिप वराळ,गोविंद लामखडे,गणेश कवाद,भरत ढवळे, मंगेश लंके,मेजर ज्ञानेश्वर शेटे,महेश ढवळे,हौशाभाऊ शेटे,सतीश साळवे,संकेत लंके,गणेश लंके,सिताराम लंके,डाॕ.प्रमोद लंके,निलेश आढाव,संजय बोरगे आदी सह मळगंगा ग्रामिण विकास ट्रस्टचे सर्व विश्वस्त,ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी,आरोग्य,आशा सेविका,गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर व उपसरपंच बाबाजी लंके यांनी सर्वांचे आभार मानले.


"निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार असलेली जगप्रसिद्ध रांजणखळगी व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मळगंगा देवीचा मंदिर परीसर, तसेच गाव व परीसरातील अनेक विकास कामांच्या माध्यमांतून राज्यातील पर्यटकांना एक जागतिक कीर्तीचा हेवा वाटवा असे येथिल पर्यटनक्षेत्र आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या माध्यमातून विकसित करुन गावची ओळख बदलणांर.
          --- ठकाराम लंके.(सरपंच)

Post a Comment

0 Comments