शिक्षक बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी होऊन प्रशासक नेमण्यात यावे ; अन्याय निर्मूलन सेवा समितीची सहकार आयुक्तांकडे तक्रार



पारनेर रोख ठोक न्यूज
   अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेत संचालक मंडळाने लाखो रुपयांचा आर्थिक अपहार केला असून संचालक मंडळाची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी सहकार आयुक्त तथा निबंधक यांच्याकडे अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
     अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या २०२० या शताब्दी मोहत्सवाच्या निमित्ताने संचालक मंडळाने सभासदांना भेटवस्तू देण्याचे ठरवले होते. परंतु भेट स्वरूपात रोख रक्कम देण्याऐवजी वस्तू भेट दिल्या. मुळात वस्तूच्या असणाऱ्या किमतीपेक्षा दुपटीने बिले लावून लाखो रुपयाचा अपहार करण्यात आल्याचा आरोप अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच शिक्षक बँकेतील कर्मचाऱ्यांना रजेचा पगार देण्याची तरतूद केली होती परंतु, सदर रक्कम प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना न देता त्या रकमेतील ५० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून संचालकांनी काढून घेतले असल्याच्या आरोप देखील अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
         या सर्व अपहाराची प्रशासकीय पातळीवर चौकशी करण्यात यावी, व संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे केले आहे. 

Post a Comment

0 Comments