रोख ठोक न्यूज :-
ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत संदीप वराळ पाटील जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र राळेगण थेरपाळ आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करणे- 5 लक्ष रुपये या कामाचा भूमिपूजन समारंभ संदीप वराळ पाटील जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिनभाऊ वराळ पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले हे होते.
सचिन पाटील वराळ बोलताना पुढे म्हणाले की, शासनाच्या सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई वराळ यांनी निघोज जिल्हा परिषद गटात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. यापुढील काळात देखील विकास कामांचा असाच ओघ सुरू राहणार असून जिल्हा परिषद गटात विकास कामांच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई वराळ करत आहेत.
तसेच कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर,उपसरपंच योगेश आढाव,चेअरमन.अंकुशराव कारखिले,व्हा.चेअरमन दामुशेठ टकले,मा.चेअरमन भरतनाना शितोळे,विलास कारखिले,निघोज वैद्यकीय अधिकारी श्रीम.डॉ.विद्या अडसूळ मॅडम,राळेगण वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत चव्हाण,आरोग्य सेविका श्रीमती बनसोडे. एस. डी.,ग्रामपंचायत सदस्य नरेश सोनवणे,अनिता मोरे,सोसायटी संचालक शशिभाऊ कारखिले,सुखदेव कारखिले,आरोग्य सहाय्यक वसंत श्रीमंदिलकर,आरोग्य सेवक अंबादास पाचंग्रे,रोहिणी सोनवणे,मेजर गणेश कारखिले,मंगेश कार्ले,बाळा कार्ले,अतुल मोरे,दौलत गायकर,सतिष शितोळे, अक्षय इचके,पांडुरंग बेंडाले,दीपक कारखिले,सुयश कारखिले,संदीप घावटे,दिनेश कारखिले,भरत गवांडे,अंकुश वाढवणे,सोमनाथ येवले, प्रवीण कारखिले, अविनाश बेंडाले,सुनिल सोनवणे, श्रीकांत सोनवणे,रविंद्र कारखिले,शैलेश पवार,विठ्ठल डोमे,बाळू बेंडाले,आशा सेविका कांचन आवचार, उज्ज्वला सोनवणे,रिहाना शेख,आरती सोनवणे,रेश्मा साळवे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments