निलेश लंकेंचे आमदार आपल्या दारी अभियान ; पारनेर तालुक्यातील देसवडे गावातून सुरुवात


"कोरोनामुळे जनता दरबार बंद पडल्याने आमदार निलेश लंके यांचे नागरीकांच्या समस्या सोडविण्यांसाठी होम टू होम मिशन "

 रोख ठोक न्यूज (चंद्रकांत कदम)
गावच्या विकासात मोठ्या प्रमाणांत लोकसहभाग महत्वाचा आहे,तो जर असेल ग्रामविकासाच स्वप्न सत्यात यायला वेळ लागणांर नाही.त्यामुळे गावांचे मुल्यमापन मतांनी ठरावता येणार नाही,गावात ग्राम विकास महत्वाचा आहे.त्यामुळे ज्या गावात विकासाचा कामे झाली नाही,त्याठिकाणी कामे मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे.आकडे वारीच्या खोलात गेल्यावर मनस्थाप होतो असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
देसवडे(ता.पारनेर)येथे आमदार लोकनेते निलेश लंके यांचा सत्कार करतांना स्थानिक ग्रामस्थ, समवेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीना शेटे,गटविकास अधिकारी किशोर माने,शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर,राष्ट्रवादि जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र चौधरी,वनकुटेचे लोकनियुक्त सरपंच अॅड राहुल झावरे,उद्योजक विजय औटी,प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूशेठ शिर्के व अन्य.

        कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने सगळीकडे सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी अाहे.जिल्हात नागरीकासाठी अतिशय लोको उपयोगी असणांराआमदार नीलेश लंके यांचा पारनेर तालुक्यातील जनता दरबारावरही गंडांतर आले. यावर आमदार लोकनेते निलेश लंके यांनी उपाय काढला आहे.गुरुवार(दि.२५)रोजी तालुक्यातील देसवडे येथून या उपक्रमास प्रारंभही करण्यात आला.
 या उपक्रमाबाबत लंके म्हणाले,कोरोनामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले अाहे. गावागावातील सर्वाजनिक व वैयक्तिक प्रश्न थेट तालुक्यातील गावागावात जावून सोडविणार आहे. निवडणुकीचा आखाडा जिंकण्यासाठी जी काही आश्वासने दिली आहे,ती टप्पाटप्पाने पुर्ण केली जातील.रात्रंदिवस ९ वर्षात मोठा संघर्ष केला.त्याचे हे फळ आहे.गावांचे मुल्यमापन मतांनी ठरावात येणार नाही, त्यामुळे गावच्या विकास महत्वाचा आहे. त्यामुळे ज्या गावात विकासाचा कामे झाली नाही,त्याठिकाणी कामे मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे.खोलात गेल्यावर मनस्थाप होतो.मी तुमचा जनसेवक आहे त्यामुळे सामाजिक व सार्वजनिक प्रश्नाबरोबर वैयक्तिक प्रश्न सोडवू.
      कोरोनाच्या आजारावर मात करत आता थेट गावात जावुन प्रश्न सोडावे लागणार आहेत. सर्वांनी स्वतःची सह इतरांची काळजी घेवुन आपले जीवन व्यतीत करावे लागणार आहे.आदिवासी भिल्ल समाजासाठी पाण्याची टाकी,देसवडे टेकडवाडी येथे बंधारे,पंतप्रधान ग्रामसडक किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन काळेवाडी रस्ता पुर्ण केला जाईल,असे आश्वासन आमदार लंके यांनी दिले.
         या वेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीना शेटे,गटविकास अधिकारी किशोर माने,शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर,राष्ट्रवादि जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र चौधरी,वनकुटेचे लोकनियुक्त सरपंच अॅड राहुल झावरे,उद्योजक विजय औटी,प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूशेठ शिर्के तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
" या भागातिल आदिवासी,भिल्ल समाजातील मुला, मुलीचे शिक्षण,तसेच नागरीगांच्याआरोग्यांच्या प्रश्नाला आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करून येथिल लोकांचे जिवनमान बदलण्यांसाठी विशेष प्रयत्न करणांर व येथिल तरुणांना नव्याने विस्तारीत होणाऱ्या औद्योगिक वसाहातित रोजगार मिळवून देण्यांसाठी प्रयत्न करणांर."----

सरपंच अॅड राहुल झावरे .

Post a Comment

0 Comments