![]() |
पिंपळनेर(ता.पारनेर)येथे संत निळोबाराय महाराजांच्या पादुका स्वतःआमदार लोकनेते निलेश लंके यांनी आपल्या डोईवर घेवून पंढरपूरकडे मार्गस्थ प्रसंगी,अनेक मान्यवर,वारकरी.
(छायायाचित्र: सुधिर पठारे)
|
महाराष्ट्रात आध्यात्मिक व वारकरी संप्रदायाच्या दिंडीची परंपरा चालु करण्यात पिंपळनेरच्या संत निळोबारायांचा सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे या पालखीचे पुजनाचा मान मिळाला असुन हे माझे भाग्य समजतो असे आ.निलेश लंके म्हणाले.महाराष्ट्रातील दहा मानाच्या पालख्यांमध्ये संत निळोबारायांच्या पालखीचा समावेश असुन ही माझ्यासाठी व तालुक्यासाठी मानाची बाब असल्याचे सांगून हे माझे भाग्य समजतो असेही आ.लोकनेते निलेश लंके म्हणाले आहे.
टाळ मृदंगाच्या गजरात,ज्ञानोबा,तुकाराम आणि पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी संत निळोबाराय महाराजांच्या पादुका पिंपळनेर येथून पंढरपूरकडे मंगळवारी (ता.३०) दुपारी.१२.०५ वाजता मार्गस्थ झाल्या.फुलांनी सजविलेल्या एसटी बसमध्ये यंदा निळोबारायाच्या पादुका संत निळोबाराय महाराज संस्थानचे अध्यक्ष,विश्वस्त आणि सेवेकरी अशा वीस जणांबरोबर पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. पिंपळनेरकरांनी रस्त्याच्याकडेला उभे राहून या सोहळ्याला भावपूर्ण निरोप दिला.
एसटी बसच्या मागे पुढे चोख पोलिस बंदोबस्त होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पालखी सोहळ्यातील पायी वारी रद्द केली. त्यामुळे १५ जूनला प्रस्थान झाल्यानंतर संत निळोबाराय महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातच मुक्कामी होत्या. पालखी सोहळ्यातील परंपरेनुसार होणारी नित्यपूजा,आरती, किर्तन आणि जागर गेले१९ दिवस देऊळवाड्यातच संस्थानने घेतले.बुधवारी १ जुलैला आषाढी एकादशी आहे.
शासनाने केवळ वीस जणांच्या उपस्थितीत संस्थानला पंढरपूरकडे जाण्यास परवानगी दिली. त्यातही कोरोनाची टेस्ट आणि विविध अटी होत्या. शासनाच्या पत्रानुसार संस्थानने सर्व तयारी केली. मुख्य देऊळवाड्यात मंगळवारी पहाटे काकडा झाला. संत निळोबाराय मंदिरात संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने आरती झाली. भजनी मंडपात संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांची पूजा माझ्या शुभहस्ते करण्यात आली.सकाळी १०.०० वाजता भजनी मंडपात पंचपदी झाली. त्यानंतर डोक्यावर निळोबारायाच्या पादुका घेवून मंदिर प्रदक्षिणा झाली.
प्रदक्षिणे दरम्यान दिंडीकरांनी सुंदर ते ध्यान, सदा माझे जडो तुझे मुर्ती, श्री संताचिया माथा चरणी, उजळले भाग्य आता हे अभंग झाले. प्रदक्षिणा झाल्यानंतर संत निळोबाराय महाराजांच्या पादुका डोक्यावर घेवून एसटीबस मध्ये पादुका ठेवण्यात आल्या.यावेळी आमदार लोकनेते निलेश लंके,संस्थानचे अध्यक्ष पालखी सोहळा प्रमुख,प्रांत मा.सुधाकर भोसले, डी.वाय.एस. पी.मा.अजित पाटील,तहसिलदार,सौ.ज्योती देवरे मॅडम,पी.आय भोसले,सहायक पी.आय.राजेश गवळी इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.रस्त्याच्या दोन्ही बाजूने ग्रामस्थ उभे होते.भाविकांनी एसटी बसवर फुलांचा वर्षाव केला.
"सुख पंढरिये आले | पुंडलिकें साठविले || घ्यारे घ्यारे माझे बाप| जिव्हा घेऊनि खरे माप|| करा एक खेप | मग नलगे हिंडणे||" खरे सुख पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनात आहे. त्यामुळे वर्षातून एकदा आषाढी एकादशीला जावे अशी भावना वारकऱ्याच्या मनात असते. त्यानुसार तो वारीत येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे संपूर्ण विश्वालाच त्रास होत आहे. त्यामुळे वारी रद्द झाल्याचे दुःख न दाखवता वारकरी आपल्या मनातून सावळ्या विठोबाचे दर्शन घेत आहे,याची प्रचिती पिंपळनेर येथे येत होती.

0 Comments