दारू अड्डा चालवणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

रोख ठोक न्यूज पारनेर


 राळेगण थेरपाळ  ता. पारनेर येथील सुवर्णराज हॉटेलचा मालक व पारनेर कृषी विभागात कार्यरत सहाय्यक कृषी अधिकारी शिवकांत भाऊसाहेब कोल्हे याच्या सह त्याच्या दोन साथीदारांवर  अवैधरित्या गावठी दारू विकल्याचा गुन्हा पारनेर पोलिसांकडून दाखल करण्यात आला.
     कृषी अधिकाऱ्याचा दारू अड्डा या आशयाच्या बातम्या रोख ठोक न्यूज ने प्रकाशित करताच  ,पारनेर पोलिस ठाण्याचे निरिक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिसांनी कारखिले वस्तीयेथील या दारू अड्यावर
छापा मारून  १२५० रूपयांचा गावठी दारूसाठा
जप्त करण्यात आला. याबाबत पोलिस हे. कॉ. नरसिंह शेलार यांनी शिवकांत भाऊसाहेब कोल्हे, नारायन किसन पवार, शोभा किसन पवार या  तीघांविरूद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
     या कृषी अधिकाऱ्याने तीन वर्षापासुन येथे जागा खरेदी करून  हॉटेल चालु केले होते.परंतु तिथे जेवणाऐवजी गावठी, देशी -विदेशी दारू विक्री केली जात होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. परंतु माझ्या जागेत मी काहीही करील अशी अरेरावी तो सतत करत होता. त्यामुळे ग्रामस्तही हतबल झाले होते. अखेर शनिवारी  या कृषी अधिकाऱ्याला ग्रामपंचायत कार्यालयाकडून दारू विक्री बंद करण्यासाठी  नोटीस बजावण्यात आली होती. कृषी विभागातील अधिकारी सरकारी नोकर असतानाही असे उद्योग करत असल्याबाबत  नागरिकांनी आश्वर्य व्यक्त केले आहे.या कृषी अधिकाऱ्याची या प्रकरणी विभागीय चौकशीची मागणी लोकजागृती सामाजिक  संस्थेने केली आहे.


Post a Comment

0 Comments