विविध उद्योग व पारंपारीक व्यवसाय करनारे बारा-बलुतेदारांना शासकीय मदत जाहीर करा - सागर आगळे


रोख ठोक न्यूज (प्रतिनिधी किरण थोरात)
समाजातील तळागाळातील जनतेसाठी विविध उद्योग व पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या बारा-बलुतेदार यांच्यावर सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाच्या वतीने त्यांना नुकसान भरपाई पोटी शासकीय मदत मिळावी अशी मागणी बलुतेदार महासंघाचे युवक जिल्हा व लोहार युथ फाऊंडेशनचे संपर्क प्रमुख सागर आगळे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

       सध्या देशात कोरोणा विषाणु ( कोविड -१ ९ ) ची राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे . त्यासाठी प्रतिबंध उपाय योजना राबविण्यात येत आहेत . राज्यात साथरोग अधिनियम -१८९ ७ च्या अनुषंगाने , महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना नियम २०२० नियम लागू आहेत . अहमदनगर जिल्ह्यात  कोरोना विषाणूंचा संसर्ग व संक्रमण प्रतिबंध उपाय योजना पर्यवेक्षण व नियंत्रणाचे काम युद्धपातळीवर चालु आहे . या परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे साठी संपुर्ण देशा मध्ये गेली दोन महिण्यांनपासून लॉकडाऊन असल्यामुळे मोठ्या व छोट्या व्यवसायांबरोबरच पारंपारीक छोटे व्यवसाय- उद्योगधंदे करणाऱ्या समाजबांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
        या मध्ये प्रामुख्याने लोहारकाम , सुतारकाम , बांधकाम क्षेत्रातील कामगार , यंत्रमाग कामगार , छोटे कलाकार , ड्रायव्हर , फोटोग्राफर , मंडप डेकोरेशन , बँड वाले , हार - फुले व्यवसायीक , सलुन व्यवसायीक असे कशुल व अकुशल कामगार आदींबरोबरच कुंभार , चर्मकार , तांबट , सोनार , नाभिक , परीट , गुरव , मातंग आदी बारा बलुतेदार समाज बांधवांचा प्रामुख्याने समावेश आहे . अशा विविध क्षेत्रातील उद्योजक व्यवसायीक कामगार वर्ग पारंपारीक व्यवसाय करणारे बारा बलुतेदार आदींना लॉकडाऊनच्या काळात झालेल्या नुकसान भरपाई पोटी शासनाकडून आर्थिक मदत मिळणे आवश्यक असुन तरी विविध उद्योग व पारंपारीक व्यवसाय करणारे बारा बलुतेदार यांना आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मा.ना.धनंजय मुंढे साहेब व अहमदनगर जिल्हाधिकारी  कार्यालय यांच्याकडे  बारा बलुतेदार महासंघाचे अहमदनगर युवक जिल्हा व लोहार युथ फाऊंडेशनचे  मध्य महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख अध्यक्ष सागर आगळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments