सहाय्यक निबंधकांच्या चौकशी अहवालावरून उघड
बँकेच्या अधिकारी व संचालकांवर गुन्हे दखल करण्याची कृष्णकांत शहाणे यांची मागणी
रोख ठोक न्यूज (विशेष प्रतिनिधी)कर्ज घेते वेळी गहाणखत ठेवलेले घर व जागा याचा लिलाव न करता गहाणखत व्यतिरिक्त असणारी वडिलोपार्जित शेतजमीनीचा लिलाव करून कवडीमोल भावात विकली असल्याचा अजब प्रकार पारनेर सैनिक बँकेने केला आहे. कृष्णकांत शहाणे यांच्या तक्रारीनंतर पारनेरचे सहाय्यक निबंधक सुखदेव सुर्यवंशी यांच्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकार उघडकीस आला.
याबाबत सविस्तर असे की, सराफ व्यावसायासाठी नारायण नाना शहाणे यांनी पारनेर सैनिक बँकेकडून २००३ मध्ये कर्ज घेतले होते. कर्ज घेते वेळी नारायण शहाणे यांनी सुपे येथील मिळकत नंबर ३१४ व ३१५ मधील घर गहाणखत ठेऊन सैनिक बँकेकडून ८ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्ज थकीत झाल्याने सैनिक बँकेने ११ लाख २५ हजार ५४१ इतक्या रकमेचा वसुली निवडा प्राप्त करून घेण्यात आला. त्यानुसार बँकेचे वसुली अधिकारी यांनी कलम १५६ मधील तरतुदी नुसार कर्जदार यांनी गहाणखत करून दिलेल्या मिळकतीचा जाहीर लिलाव करून विक्री करणे आवश्यक असताना बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी कर्जदारांनी सुपा येथील कर्जादराची वडिलोपार्जित असणारी शेतजमीन गट नंबर ६२ मधील २.०३ ही मालमत्ता २०१० मध्ये जप्त करून २०११ मध्ये लिलाव करून ८ लाख ७५ हजाराला विक्रीकरण्यात आली.
२०११ मध्ये कर्जदाराची जमीन लिलाव केल्यानंतर साधारण २ वर्षानंतर म्हणजे १५.०१.२०१३ मध्ये ७ लाख कर्जदाराच्या खात्यावर जमा केली. कर्जदाराच लिलाव १४.०२.२०११ मध्ये झालेला १७.४.२०१२ पर्यंत ३३ हजार पाचशे रुपये वसुली खर्च कर्जदाराच्या नावे टाकलेले असून त्याचे व्हाउचर उपलब्ध नाहीत. १५.१.२०१३ रोजी कर्जदारकडून कर्जाची रक्कम ८लाख ९१ हजार ९८० येणे होते त्यावेळी कर्जदाराच्या मिळकतीच्या लिलावापोटी आलेले ८ लाख ७५ हजार रुपये रक्कम पूर्ण खात्यात भरल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नारायण नाना शहाणे यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सैनिक बँकेच्या वसुली अधिकारी यांनी नियमबाह्य केली असल्याचा चौकशी अहवाल पारनेर सहाय्यक निबंधक सुखदेव सुर्यवंशी यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिला आहे.
याबाबत तक्रारदार कृष्णकांत शहाणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून गहाणखत व्यतिरिक्त आमची वडिलोपार्जित शेतजमीन बँकेचे अधिकारी, संचालक यांनी कवडीमोल भावात विकली असून लिलाव घेणारा तत्कालीन संचालकाच पुतण्या आहे. त्यामुळे सर्वांनी संगनमताने हा अपहार केला असून बँकेतील अधिकारी, कर्मचारी व बँकेचे संचालक यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्फत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
दोषींवर त्वरित कारवाई झाली पाहिजे - रोडे
पारनेर सैनिक बँकेकडून अनेक कर्जदारांना फसवून त्यांच्या शेतजमिनी कवडीमोल भावात विकल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी नंतर सहाय्यक निबंधक यांनी अहवाल देऊन बँकेचे अधिकारी दोषी असलेबाबत अहवाल दिले आहेत. अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. तरी यातील दोषींवर गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हावी अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी "रोख ठोक न्यूज" सोबत बोलताना केली आहे.


0 Comments