कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांची राज्यस्तरीय ' उत्कृष्ट फलक लेखन शिक्षक ' म्हणून निवड

रोख ठोक न्यूज:-
अभिरंग बाल कला संस्था कल्याण यांच्या वतीने लॉक डाऊनच्या काळात घेण्यात आलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर चे कलाशिक्षक ज्ञानेश्वर रामदास कवडे यांची ' उत्कृष्ट फलक लेखन ' शिक्षक म्हणून निवड करण्यात आली त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातून शेकडो कला शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. राज्यातील कला शिक्षकांसाठी या अभिनव स्पर्धेचे आयोजन अभिरंग बालकला संस्थेचे अध्यक्ष सुजित जोशी यांनी केले होते. स्पर्धेचे परीक्षण ख्यातनाम चित्रकार प्राध्यापक महावीर पाटील व चित्रकार अंबादास जोशी यांनी केले.
      श्री कवडे यांनी आतापर्यंत विविध फलक लेखन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. सोशल मीडिया व विद्यार्थ्यांमध्ये कवडे सर यांनी दिनविशेष फलक रेखाटन केलेल्या फलकांची नेहमीच चर्चा होत असते.त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा मराठा चे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील व सचिव जी.डी.खानदेशे साहेब व पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुलभैय्या झावरे पाटील तसेच विद्यालयाचे प्राचार्य मुकुंद जासुद व सर्व शिक्षक बंधू-भगिनी व मित्रपरिवार यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments