ग्रामपंचायतीचे जागा मालकाला नोटीस
पारनेर रोख ठोक न्यूज :-
पारनेर तालुक्यातील कृषी विभागात कार्यरत असणाऱ्या एका बहाद्दराने राळेगण थेरपाळला शिरूर - बेल्हा रोडलगत कारखिले वस्ती शिवारात जागा खरेदी करून हॉटेलसाठी ईमारत बांधुन तिथे गावठी दारूचा अड्डा चालु केला आहे. हा दारू अड्डा एक पंटर सांभाळत असल्याचे समोर येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासुन तिथे गावठी व देशी विदेशी दारूची जोरदार विक्री केली जाते. परिसरातील नागरिकांना दारूड्यांच्या वर्दळीमुळे त्रास होत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे केल्या त्यानुसार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही या हॉटेल मालकाला दारू विक्री बंद करण्याचे सांगितले, परंतु "माझ्या मालकिच्या जागेत मी काहीही करू शकतो", असे उर्मट उत्तरे संबंधित धाबामालक असणारा कृषी अधिकारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना देत आहे. या बाबतची तक्रार येथील काही ग्रामस्थांनी लोकजागृती सामाजिक संस्थेकडे केली होती.
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अधिक माहिती घेतली असता तो कृषी अधिकारी "पंटर" मार्फत धाबा चालवतो असे समजले.असुन स्वतःच धाबामालक आहे.शिवकांत भाऊसाहेब कोल्हे असे त्या धाबा मालकाचे नाव असून तो कृषी अधिकारी आहे. लोकजागृती सामाजिक संस्थेने या बाबतची तक्रार पोलिसांकडे करून त्या धाबा मालकाविरोधात दारू विक्रीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कृषी विभागाकडे या अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. यापुर्वी याच धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी धाडी मारून दारू विक्रीचे गुन्हे दाखल केलेले आहेत.परंतु ते सर्व गुन्हे या धाबा मालकाच्या पंटरवर असल्याचे समजते.

राळेगण ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्याला दारू विक्री बंद करण्यासाठी नोटीसही पाठवण्यात आली आहे. गट नं. २६७ मध्ये असणाऱ्या ईमारत क्र. ३८७ या मिळकती मध्ये चालु असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची सुचना नोटीस मध्ये नमुद केली आहे. याशिवाय गावामध्ये इतर ठिकाणी ही अनेक दारू अड्डे आहेत तेही पुर्णपणे बंद करण्यासाठी ग्रामस्त एकजुटीने पुढाकार घेणार असल्याचे सरपंच पंकज कारखिले यांनी सांगितले.

0 Comments