राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत वतीने सॅनिटायझर व मास्क वाटप

रोख ठोक न्यूज :-
सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस (कोविड १९) सारख्या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले असून अशा गंभीर परिस्थितीत आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महावितरण कर्मचारी, शिक्षक वृंद जनतेच्या सेवेसाठी दिवसभर सेवा देत आहेत.
राळेगण थेरपाळ येथे सरपंच पंकज दादा कारखिले यांच्या हस्ते व दानशूर व्यक्तीमत्व उद्योजक रविंद्र आढाव सर यांच्या वतीने महावितरण कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले
राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत वतीने सॅनिटायझर व मास्क वाटप करताना सरपंच पंकज दादा कारखिले. छाया - चंद्रकांत कदम.

Post a Comment

0 Comments