रोख ठोक न्यूज :-
लॉक डाऊन मुळे लोकांचे रोजगार गेले, हाताला काम नाही, एकवेळ खाण्याचे वांदे, उपासमार सुरू अशातच देवदुतासारखे धावून येत गोरगरिबांच्या चुली पेटवून त्यांना जीवनावश्यक किराणा निस्वार्थी भावनेने वाटण्याचे काम पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे करत आहेत.
डॉ श्रीकांत पठारे यांनी नुकतेच सांगवी सूर्या येथे गोरगरीब व गरजू पन्नास कुटुंबांना जीवनावश्यक किराणा वाटप केला. यापूर्वी त्यांनी जवळे, सांगवि सुर्या, गांजीभोयरे येथील शासकीय निवारा केंद्र व गोरगरीब कुटुंबांना भेट देऊन जीवनावश्यक किराणा वाटप केले आहे. त्यांच्या सामाजिक दातृत्वा बद्दल पारनेर तालुक्यासह परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. लढाईच्या काळात त्यांच्या हाताला काम नाही, रोजगार नाही, त्यांची खाण्या-पिण्याची भ्रांत आहे अशा कुटुंबांना आम्ही जीवनावश्यक किराणा वाटप करत असून अजूनही कोणी भुकेने व्याकूळ असतील अशा कुटुंबांची माहिती आम्हाला द्यावी आम्ही त्या कुटुंबापर्यंत मदत पोचवली आहे असे आवाहन पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी केले आहे. सांगवी सूर्या येथे गरजूंना जीवनावश्यक किराणा वाटप करतेवेळी रस्त्याने परप्रांतीय मजूर जात असल्याचे डॉक्टर पठारे यांच्या निदर्शनास आले. पठारे यांनी त्यांना तात्काळ थांबून त्यांची विचारपूस करून त्यांनादेखील जीवनावश्यक किराणा वाटप केला. डॉक्टरांच्या सामाजिक बांधिलकी व दातृत्व मुळे "अडचणीच्या काळात तुम्ही देव-दुतसारखे धावून आले" असल्याची प्रतिक्रिया परप्रांतीय मजुरांनी दिली.
सांगवी सूर्या येथे ५० कुटुंबांना जीवनावश्यक किराणा वाटप करतेवेळी पारनेर पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, सांगवी चे सरपंच संदीप रासकर, उपसरपंच संदीप आढाव, अंकुश मस्के, शरद कोठावळे, रघुनाथ कोठावळे, चंदू कोठावळे, ईश्वर आढाव, ज्ञानेश्वर आढाव, भागचंद इरोळे व रामदास कोठावळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments