रोख ठोक न्यूज किरण अनिल थोरात
आज खऱ्या अर्थाने देशावर असणार कोरोना संकट पाहता. महाराष्ट्रभर मदत कार्य मनसे पक्षातर्फे तसेच महाराष्ट्र सैनिक करत आहे.परंतु वन्य प्राण्यांना पाण्यासाठी रानमाळ वनवन भटकंती करावी लागत आहे. ही बाब तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांच्या लक्षात आल्यावर पारनेर तालुक्यातील गारखिंडी गावातील महाराष्ट्र सैनिक तसेच पक्षाचे नेते पुढे सरसावले व रात्रीचा दिवस करून या वन्यजीवांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गावातील आणवाट व बारगणी या ठिकाणी प्लास्टिक टाकी कापुन पाणवटा तयार करण्यात आला. यासाठी गावातील मनसे नेते अमोल झिंजाड , अजय चौधरी, तुषार झिंजाड , सुशांत शिंदे, अभिषेक झिंजाड आदी महाराष्ट्र सैनिकांनी श्रम घेऊन वन्य प्राण्यांना कडाक्याच्या उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी पाणवटा पुर्णत्वाला नेत त्यात दररोज पाणी टाकण्यात येत आहे.
अशा या स्तुत्य उपक्रम केल्याबद्दल तालुक्यातील महाराष्ट्र सैनिक व प्राणीमित्रांचे गावकरी कौतुक करत आहे.

0 Comments