रोख ठोक न्यूज :-
कोरोना सारख्या भयंकर विषाणूने जगामध्ये थैमान घातले असताना स्वतःचा जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय सेवा बजावत असणाऱ्या पारनेर येथील ओंकार हॉस्पिटल चे संचालक डॉ श्रीकांत पठारे यांना पारनेर पोलिस स्टेशन कडून पीपीई किट भेट देण्यात आली.
जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र रस्त्यावर उभे राहून जनतेची सेवा करत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घेत डॉ श्रीकांत पठारे यांच्याकडून पारनेर पोलिस ठाणे हद्दीत थर्मल क्लिनिक अंतर्गत पोलिसांच्या कुटुंबासह पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यावेळी सामाजिक भावनेतून काम करत असणाऱ्या डॉ श्रीकांत पठारे यांचा देखील सन्मान यानिमित्ताने पारनेर पोलिसांच्या वतीने पिपीई किट देऊन करण्यात आले.
यावेळी पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पोलिस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, अण्णा चव्हाण तसेच मुख्यालयातून आलेले पोलिस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.
समाजसेवा हीच ईश्वरसेवा - डॉ पठारेवैद्यकीय सेवेचे व्रत हाती घेतल्यापासून समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे समजून मी समाजाची सेवा करत आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कोरोना महामारीच्या काळात आपल्या व कुटुंबांच्या आरोग्याची काळजी न करता आपल्या रक्षणासाठी दिवसरात्र रस्त्यावर उभे असणाऱ्या पोलिस व त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.

0 Comments