जवळे येथे ३० तर पानोलीत १८ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप
रोख ठोक न्यूज :-डॉ श्रीकांत पठारे व मित्रपरिवारा कडून पारनेर तालुक्यातील गोरगरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व किराणा वाटपाचा ओघ सुरूच असून आज जवळे येथील उर्वरित ३० तर पनोलीतील उर्वरित १८ कुटुंबांना जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात आला.
यापूर्वी डॉ श्रीकांत पठारे यांच्या मित्र परिवाराकडून जवळे, सांगवी सूर्या, गंजिभोयारे, पिंपरी जलसेन, पानोलि याठिकाणी गरजूंना जीवनावश्यक किराणा वाटप केला होता. यावेळी आणखी गरजू व्यक्तींची नावे द्या त्यांना देखील वस्तूंचे वाटप होईल असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे यांच्याकडून करण्यात आले होते. त्याअनुषंगाने जवळे येथील उर्वरित ३० कुटुंब व पानोली येथील १८ कुटुंबांना जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात आला.
पानोली येथे किराणा वाटप केला यावेळी पानोलीचे सरपंच संदीप गाडेकर, उपसरपंच शशिकांत भगत, अण्णा शिंदे, रामा थोरात,प्रशांत राजे निंबाळकर, सुनील शेळके तर जवळे येथे किराणा वाटप करते वेळी माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे, रमेश रासकर सर, बाबू साळवे, योगेश काळे, अरुण पाटील सालके, गोरख पाटील सालके, प्रदीप काका सोमवंशी चेअरमन, गजानन लोंढे, शुभम पठारे, अनुश साळवे, गणेश रोकडे, शिवाजी एडगुले, कांताबाई लंके, आवेश काळे,भाऊ सोनबा साळवे, दत्ता बरशिले, शहाजी बरशीले आदी उपस्थित होते.

0 Comments