रोख ठोक न्यूज पारनेर
विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराव औटी यांच्या शुभहस्ते व पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे व मित्रपरिवार यांच्याकडून पिंपरी जलसेन येथे ५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात आला.
लॉक डाऊन मुळे रोजगार नाही, हाताला काम नाही त्यामुळे अनेक कुटुंबांची एका वेळेची खाण्याची भ्रांत होती. अनेक गोरगरिबांची उपासमार होत असल्याचे डॉ श्रीकांत पठारे यांच्या निदर्शनास आले. डॉ पठारे व त्यांच्या मित्र परिवार कडून तत्काळ पिंपरी जलसेन येथील सुमारे ५० कुटुबांना आज जीवनावश्यक किराणा वाटप केले. पारनेर तालक्यातील पठारवाडी येथे देखील आज ४५ कुटुंबांना जीवनावश्यक किराणा वाटप करण्यात आला. विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी आ. विजयराव औटी यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी कोरोनाशी लढत असताना आपल्या आरोग्याची खबरदारी घेणे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडत असताना तोंडाला मास्क वापरणे आदी सल्ला विजयराव औटी यांनी नागरिकांना दिला. डॉ पठारे हे सामाजिक काम करत असताना सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होत आहेत. त्यांनी त्यांचे समाजकार्य असेच सुरू ठेवावे असे देखील आ. विजयराव औटी यांनी डॉ श्रीकांत पठारे यांना सांगितले.
यावेळी पनोलीचे उपसरपंच शशिकांत भगत, जगदीश सोनवणे, ईश्वर आढाव, दत्ता थोरात, बबन घेमुड, अशरफ शेख, जयसिंग थोरात, दगडू थोरात, निलेश सोनवणे, अक्षय बोरुडे, आदिनाथ कदम, बाळासाहेब वाढवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी सामाजिक अंतर ठेऊन जीवनावश्यक किराणा वाटप केला.

0 Comments