पारनेर तालुक्यातील तिखोल आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांचा मनमानी कारभार

रोख ठोक न्यूज पारनेर 
किरण थोरात 


चौकशी करून प्रशासकीय कार्यवाही करून निलंबन करावे
पारनेर तालुक्यातील तिखोल येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मुख्यालयात राहत नसून त्यांची लवकरात लवकर चौकशी करून प्रशासकीय कारवाई करून निलंबन करावे, तसेच पारनेर तालुक्यातील इतर गावांमध्ये असणाऱ्या आरोग्य केंद्र राज्य आरोग्य
केंद्रातील कर्मचाऱ्यांची   चौकशी व्हावी   - अरुण रोडे  


अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती अहमदनगर चे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी आरोग्य अधिकारी अहमदनगर यांना निवेदन दिले होते याचा पाठपुरावा करत पारनेर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे  यांनी या संदर्भात पाठपुरावा करत तिखोल उपकेंद्रातील आरोग्य सेविका यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
     याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ . तिखोल उपकेंद्रातील आरोग्य सेविका ह्या नियमानुसार मुख्यालयी थांबणे  बंधनकारक असूनही मुख्यालयी राहत नाहीत . २ . सद्यस्थितीमध्ये कोचीड २०१९ ( CORONA ) या विषाणूच्या संसर्गजन्य आजाराबाबत सर्व भागात भितीचे वातावरण तयार झालेले असून ग्रामस्थांना शासनाने ठरवून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे तंतोतंत पालन करण्यासंबधी कार्यवाही करणे संबंधित आरोग्य सेविका यांचे कर्तव्य आहे . असे असतानाही आरोग्य सेविका मनमानी पध्दतीने कामकाज करीत आहे . ३ . तिखोल हे गाव डॉगर दऱ्या मध्ये असून तेथे तातडीच्या रुग्णसेवेसाठी गरजुंना उपकेंद्रामध्येच जावे लागत असते , तथापि संबंधित  आरोग्य सेविका या मुख्यालयी राहत नसल्याने गरजू रुग्णांना पर्यायी इतर खाजगी रुग्णालयात जावे लागते . खाजगी रुग्णालयांचा वैदयकीय खर्च हा सर्वसाधारण कुटुंबाला परवडणारा नसतो .  हे मुद्दे रोडे यांनी त्यांच्या निवेदनामध्ये मांडले होते.
      आजच्या स्थितीमध्ये कोबीड २०१९ (CORONA ) या विषाणूच्या संसर्गजन्य आजाराबाबत शासनाने युद्ध पातळीवर  मोहिम सुरु केलेली आहे . राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ लागू करण्यात आलेला आहे . मा . जिल्हाधिकारी , अहमदनगर यांचेकडील आदेश क कार्या १९ अ / २२४ / २०२० दिनांक २३ / ०३ / २०२० नुसार राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २ . ३ . ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . मा . मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडील आदेश क आरोग्य / कार्या - २ / आस्था २ / ५९५ / २०२० दिनांक २३ . ०३ . २०२० नुसार प्राथमिक आरोग्य  केंद्रावरील सर्व वेदयकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी २४ तास मुख्यालयास राहणे बंधनकारक आहे . असे असतानाही आपण स्वत : आरोग्य कर्मचारी म्हणून आपली सामाजिक व वैयक्तिक जबाबदारी कर्तव्य याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणे ही बाब प्रशासकीय दृष्टया अत्यंत खेदनिय  आहे .
तरी वरील तक्रारीमध्ये नमूद बाबींचा  लेखी व वस्तुनिष्ट खुलासा पत्र मिळालेपासून दोन दिवसात समक्ष सादर करावा . खुलासा  विहीत कालावधीत समर्पक व वस्तुनिष्ट न मिळाल्यास पुढील कार्यवाही प्रस्तावित केली जाईल व होणाऱ्या  परिणामांस आपण व्यक्तीश : जबाबदार राहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी  असे  पत्र  पाठवण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments