दिलासादायक बातमी... पारनेरच्या त्या मृत व्यक्तीच्या संपर्कातील १० जणांचे अहवाल निगेटिव्ह ; १ अहवालाची प्रतीक्षा

रोख ठोक न्यूज:-

     पारनेर तालुक्यातील त्या कोरोनाग्रस्त तरुणाच्या मृत्युनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ११  व्यक्तींची  तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दहा व्यक्तींचा  नुकताच  अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला असून दहा व्यक्ती निगेटिव असून अजून एक व्यक्तीचा अहवाल येणे बाकी आहे.
            यापूर्वी त्या मृत तरुणांच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित संपर्कातील दहा व्यक्तींचा अहवालाची पारनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याला प्रतीक्षा होती. उर्वरित ११ पैकी १० अहवाल आज प्राप्त झाले असून १० व्यक्ती निगेटिव्ह आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्याला दिलासा मिळाला आहे. 
      

Post a Comment

0 Comments