दिलासादायक........पारनेरच्या त्या मृत तरुणाच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह ; इतर अहवालाची प्रतीक्षा

रोख ठोक न्यूज :-
कोरोनामुळे एक ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पारनेर तालुका हादरला होता. त्यात आज त्या मृतकाच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने पारनेर तालुक्याला दिलासा मिळाला आहे. अजून इतर दहा लोकांचा अहवालाची प्रतीक्षा असून तेव्हा आज सायंकाळपर्यंत प्राप्त होतील असा विश्वास आहे.
       सोमवार दिनांक 12 रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तालुक्यातील पिंपरी जलसेन च्या जावयाचा मृत्यू झाला होता. मृत्यू पश्चात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने त्या मृतकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून घाशाचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी आज त्यामुळे त्याच्या पत्नीचा अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. त्यामुळे पारनेर तालुक्यांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.परंतु त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले इतर दहा व्यक्तींची अहवाल येणे बाकी असल्याने त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा पारनेर तालुक्याचा आहे. इतर अहवाल आज सायंकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे.
         प्रशासनाने पुढील उपाययोजना म्हणून पिंपरी व निघोज हे गाव प्रतीबंधत्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. चालू आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याची चौकशी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments