पारनेर तालुक्यातील "त्या" मृत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी नगरला हलवले..... अहवालाची प्रतीक्षा.

पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णाचा बळी ; पिंपरी जलसेन सील
रोख ठोक न्यूज पिपंरी जलसेन
            पिंपरी जलसेन येथील जावयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाच्यावतीने पिंपरी गाव पूर्णपणे सील केले असून,गावातील दुकाने व इतर सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. प्रशासनाच्या वतीने पुढील उपाययोजना करण्यात येत आहे.
          दि. १२ रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने निघोज येथील रहिवाशी असलेल्या व पिंपरी जलसेन येथे सासरवाडीत राहत असलेल्या  जावयाला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्याच्या घशातील स्त्राव तपासणी नमुने घेण्यात आले होते. 13 रोजी सायंकाळी या मृत युवकाचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला. व तो युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ प्रशासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी तात्काळ आदेश देऊन पिंपरी व निघोज गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पिंपरि जलसेन मधील गावातील सर्व दुकाने, पतसंस्था व सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून तहसीलदारांचा पुढील आदेश येईपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
       त्या युवकाच्या मृत्यूपश्चात त्याचा अहवाल पॉझिटिव आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून त्या मृतकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ताब्यात घेऊन  त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्या युवकाच्या  थेट संपर्कात आलेल्या नातेवाईकांची चौकशी सुरु असून त्या नातेवाईकांना देखील तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालय पाठवण्यात येणार आहे. कारोणा समितीच्यावतीने संपर्कात आलेल्या नातेवाईकांचा शोध सुरू असून या व्यतिरिक्त जे जे नातेवाईक, ग्रामस्थ त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत त्यांनी स्वतःहून आपली नावे प्रशासनाकडे देऊन कोरोणा चाचणी करून घेण्याचे आवाहन कोरोणा समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 
   
 तहसीलदारांची ती ऑडिओ क्लिप गाजली 
 पिंपरी जलसेन येथे मृत पावलेल्या जावयाचे मुंबई मधून निघाल्यापासून ते थेट त्याचा मृत्यू बाबत व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींकडून संसर्ग कसा पसरवला जाऊ शकतो या सर्व प्रवासांची एक ऑडिओ क्लिप पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले असून ती क्लिप सध्या व्हाट्सअप वर चांगलीच व्हायरल होत आहे.

मृताच्या संपर्कातील नातेवाईकांच्या अहवालाची प्रतीक्षा
९ वर्षीय रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने पुढील उपाययोजना म्हणून त्या मृत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १६ नातेवाईकांना कोरोना तपासणी साठी अहमदनगर येथे पाठवले आहे. त्यापैकी ९ जणांचे  घशाचे स्त्राव तपासणी साठी घेतले असून तपासणी अहवाल आल्यानंतर नातेवाईकांना संसर्ग झाला आहे की नाही हे स्पष्ट होणार असून तालुक्याचे लक्ष नातेवाईकांच्या तपासणी अहवाल कडे लागून आहे.

         

Post a Comment

0 Comments