पिंपरी जलसेनकरांनो ...तुमची. . "देवाक काळजी रे".....

रोख ठोक न्यूज:-
        ३ दिवसांपूर्वी कोरोना मुळे पिंपरी जलसेन येथे एका जावयाचा मृत्यू झाला तेव्हापासून पिंपरी, निघोज सह पारनेर तालुक्याला घोर लागला होता. मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 13 पैकी 10 व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित एक अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे पिंपरी जलसेन व निघोजकरांसह पारनेर तालुक्याला दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे ३९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्या पासून पिंपरी जलसेन येथील नागरिकांनी गावाला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी गावचे ग्रामदैवत रोकडेश्वर महाराजांना साकडे घातले होते. त्यातच आज ११ पैकी १० अहवाल निगेटिव्ह आले असून एक अहवालाची प्रतीक्षा असून तो अहवाल देखील निगेटिव्ह येणार असल्याचा विश्वास पिंपरी करांना असून पिंपरी करांनो तुमची देवाक काळजी रे......असे म्हणण्याची वेळ आली आहे.
        पिंपरी जलसेन हे तसे धार्मिक गाव, तालुक्यामध्ये नावजलेला व  गेल्या ८८ वर्षांपासून अखंडपने हरिनाम सप्ताह आयोजित केले जात आहेत. गावातील ग्रामदैवत रोकडेश्वर यांच्यावर गावकऱ्यांची अपार श्रध्दा आहे. गावकऱ्यांच्या अडचणीच्या काळात नेहमी भक्तासाठी धावून येतो अशी भावना रोकडेश्वर महाराजांविषयी गावकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे गावकरी नेहमी देवाला साकडे घालत असतात व रोकडेश्वर देखील भक्तांच्या हाकेला धावून येतात अशी आख्यायिका आहे.
          नुकतेच तीन दिवसांपूर्वी कोरणा विषाणूमुळे संपूर्ण गावासह पारनेर तालुका अडचणीत सापडला होता. या अडचणीच्या काळामध्ये ग्रामस्थांनी गावचे ग्रामदैवत असणाऱ्या रोकडेश्वर महाराजांना साकडे घातले. नेहमीप्रमाणे भक्तांच्या हाकेला धावून येणारा रोकडोबा महाराजा ११ पैकी १० अहवाल निगेटिव्ह येऊन त्याद्वारे भक्तांवरील संकट दूर केल्याचे पिंपरी जलसेन ग्रामस्थांच्या कडून बोलले जात आहे. "आमच्या देवाक काळजी रे"... असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments