शेतकर्‍यांच्या जमिनीचे बेकायदेशीर विक्री करणाऱ्या पारनेर सैनिक बँकेचे अधिकारी व तलाठी, मंडळाधिकारी व दुय्यम निबंधक यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत.


अन्याय निर्मूलन सेवा समितीची मागणी
रोख ठोक न्यूज पारनेर:-
     पारनेर तालुक्यातील १७ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर बेकायदेशीर बोजा चढवून त्यांची कवडीमोल भावाने विक्री करणाऱ्या पारनेर सैनिक बँकेचे अधिकारी, त्यांना मदत करणारे तलाठी, मंडलाधिकारी व दुय्यम निबंधक यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकऱ्यांना केली आहे.
        २०१० पासून पारनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर तालुका सैनिक बँक यांनी संगनमताने बेकायदेशीर बोजा चढवून तलाठी व मंडळाधिकारी यांना आर्थिक सहाय्य देऊन कुठल्याही कर्जदाराची जमीन तारण नसताना सैनिक बँकेच्या बेकायदेशीर पत्रावरून बोजा चढवून लिलाव प्रक्रिया करत सैनिक बँकेचे अधिकारी व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सदर शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात विकल्या. याबाबत सदर व्यक्तीची चौकशी करून पारनेर तालुक्यातील १७ शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी  शेतकऱ्यांनी व  अन्याय निर्मूलन सेवा समितीने २१/०१/२०२० ते २४/०१/२०२० रोजी उपोषण केले होते. त्यावेळी १५ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. तरी अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने सदर पारनेर सैनिक बँकेचे अधिकारी व तलाठी, मंडलाधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments