ब्रेकिंग.... आनंददायी बातमी. पारनेरच्या त्या कोरोनाग्रस्त मृत युवकाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

रोख ठोक न्यूज:-

       संपूर्ण पारनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेले पारनेर तालुक्यातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्या पिंपरी जलसेन येथील जावयाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
      सोमवारी 12 मे रोजी श्वसनाचे त्रास होऊ लागल्याने अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात नेत असताना पिंपरी जलसेन येथील जावयाचा मृत्यू झाला होता. सदर व्यक्ती मुंबई वरून आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरण कक्षात राहिला नसल्याने मृत्युपूर्वी तो अनेक नातेवाईकांच्या संपर्कात आला होता. त्याच्या मृत्यूपश्चात ालुक्‍यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या  व्यक्तींची तपासणी करण्यात आली. काल त्या मृताच्या संपर्कातील १० व्यक्तींचे अहवाल निगेटिव आले होते. उर्वरित एका अहवालाची प्रतीक्षा होती. उर्वरित एक अहवाल आज प्राप्त झाला असून तो अहवाल देखील निगेटिव आल्याने मृताच्या संपर्कातील सर्वच्या सर्व ११ व्यक्ती निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
          त्या कोरोना ग्रस्ताच्या मृत्यूनंतर संपूर्ण पारनेर तालुक्याला घोर लागला होता. मृत्युपूर्वी सदर तरुण पारनेर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये असणारे नातेवाईकांकडे गेला असल्याने संपूर्ण पारनेर तालुका चिंतेत होता. मृताच्या संपर्कातील सर्व ११ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पारणेरकरांची धाकधूक थांबली असून पारनेर करांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

Post a Comment

0 Comments