अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा.


शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.
रोख ठोक न्यूज :-


  पारनेर तालुक्यात अवकाळी पाउस होत आहे. पुढेहि होण्याची दाट शक्यता आहे. अधिच लॉकडाउन मुळे पिचलेला शेतकरी आर्थिक बाबतीत खचून गेला आहे. शेतीमालाला बाजारभाव नाहि. अन बाजारपेठ उपलब्ध होत नाहि. अवकाळी पाउसाने शेतीमाल,फळभागा विविध शेतीमालाचे नुकसान होत आहे. अन नुकसानीमुळे शेतकरी मोडून पडल्याशिवाय राहणार नाहि. म्हणून प्रशासकीय यंत्रणा जरी कोरेना मध्ये अडकली असली तरीहि शेतकरी प्रश्न मोठा आहे.
     सबंध देश बंद असताना काबाडकष्ट करून देशाच पोट भरण्याच काम शेतकरी बाप करत आहे. म्हणूनच प्रशासनाने शेतकर्यांच्या या नुकसानीचे पंचनामे करावे. व यापुढे हि अवकाळी पाऊस पडून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपली यंत्रणा सज्ज असण्याची गरज आहे. पंचनामे करून घेण्यासाठी शेतकर्यांना मनस्ताप न देता तातडीने पंचनामे करावे. पंचनामा करण्याबाबत अडचण आल्यास अनिल शेटे यानी ९८५०२६०४२४ नंबर वर संपर्क करण्याचे अहवान केले.

    यासंदर्भात निवेदन शेतकरी नेते राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु,जिल्हाअधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी,पारनेर तहसीलदार देवरे मॅडम,तालुका कृषी अधिकारी दरेकर साहेबाना देण्यात आले.

Post a Comment

0 Comments