रोख ठोक न्यूज :-
लॉक डाऊन मुळे रोजगार नसलेल्या पारनेर तालुक्यातील पानोली येथील सुमारे ६० मजुरांना पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी जीवनावश्यक किराणा किटचे वाटप केले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी डॉ पठारे यांच्याकडे मागणी केली की, वडगाव सावताळ येथील काही मजूर आमच्या गावात अडकले आहेत. त्या मजुरांना मदत झाली तर खूप बर होईल. अशी मागणी केल्यावर डॉ पठारे यांनी तत्काळ त्या मजुरांना देखील जीवनावश्यक किराणा वाटप केला.याबाबत सविस्तर असे की, पारनेर पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत पठारे व त्यांचे मित्र परिवाराच्या वतीने लॉक डाऊन मुळे अडकलेल्या व रोजगार नसलेल्या पारनेर तालुक्यातील गरजू कुटुंबांना आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल तालुक्यातील अनेक ठिकाणांहून गरजूंना मदतीसाठी त्यांना मदत मागत आहेत. डॉ पठारे देखील आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करत असताना आता लॉक डाऊन काळात गरजूंना जीवनावश्यक किराणा वाटप करून गरिबाच्या घरची चूल पेटवन्याचे काम डॉ पठारे यांनी केले असल्याने त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व आभार मानण्यात येत आहे.
पनोली येथे जीवनावश्यक किराणा वाटप करते वेळी पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे,सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच शशिकांत भगत, प्रमोद पठारे, माजी सरपंच संदीप गाडेकर, हनुमंत खामकर, शामराव गाडेकर, रामदास भगत, शहाजी खामकर, इंद्रभान गाडेकर, डॉ रामचंद्र थोरात, बापुराजे भगत, सोन्याबापू भापकर, अंकुश गायकवाड, तुकाराम वाखारे, मोहित जाधव, सुहास औटी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments