श्रीगोंद्यातील शेतकऱ्याला पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन साठी तहसिलकडून मिळेना परवानगी

परवानगी मिळविण्यासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा ; तरीदेखील प्रशासनाला येईना जाग
अन्याय निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

रोख ठोक न्यूज :-

          दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने श्रीगोंद्यातील शेतकऱ्याने पिण्याच्या पाईप लाईन खोदकामासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयाकडे परवानगी मागितली असून ६ महिने उलटून गेले तरी अद्याप तहसीलदार यांच्याकडून परवानगी मिळाली नसल्याने व प्रशासन सहकार्य करत नसल्याने शेतकऱ्याने पाईप लाईन परवानगी साठी आत्मदहनाचा इशारा देऊन २ महिने उलटून देखील अद्याप परवानगी मिळाली नाही. याबाबत अन्याय निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
          याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदे तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकरी सागर शंकर निंभोरे यांनी त्यांना पिण्यासाठी पाण्याची पाईप लाईन करण्यासाठी व शेजारील शेतकरी शेतात कुठलेही पीक नसताना व पिकाचे नुकसान होत नसताना देखील पाईप लाईन खोदकामसाठी अडथळा आणत असल्याने खोदकामासाठी परवानगी मिळवण्यासाठी ११/०३/२०१९ रोजी तहसील कर्यालाकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या वतीने स्थळ पाहणी करून सत्य परिस्थिती जाणून घेतली व सदर शेतकऱ्याला पाइप लाइन करत असताना कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होत नसल्याचा अहवाल स्थळ पाहणी समितीने दिला आहे. प्रत्यक्ष स्थळ पाहणी समितीने अहवाल देऊन ४ महिने उलटून देखील अद्याप तहसील कार्यालयाकडून या शेतकऱ्यास पाइप लाइन खोदकमासाठी परवानगी मिळाली नसल्याने शेवटी शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला तरी देखील तहसील कार्यालयाने गांभीर्याने घेतले नसल्याने शेतकऱ्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का ?, परवानगी मिळविण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याचा जीव हवा आहे का असा सवाल अन्याय निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व समितीने जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केला आहे.
    याबाबत अन्याय निर्मूलन सेवा समितीने तक्रारीत म्हटले आहे की, श्रीगोंदा तालुक्यातील घोडगाव येथील सारंग शंकर निंभोरे हे रहिवासी असुन त्यांनी अनेक वेळा श्रीगोंदा तहसीलदार व जिलाधिकारी पत्रव्यवहार करुन आत्तापर्यंत दुष्काळी परिस्थिति असुन कुठलीही पाईप लाईन खोदकामाची परवानगी दिली नाही. सदर व्यक्तिने आत्मदहनाचा इशारा देवुनही श्रीगोंदा प्रशासनाने बघ्याची भुमीका घेतली असुन सदर व्यक्तिचा उदरनिर्वाह शेती व दुग्ध व्यवसाय असुन पाण्याशिवाय काहिच पर्याय नाही.   लवकारात लवाकर परवानगी नाहि मिळाली तर सदर व्यक्तीस आत्महत्ते शिवाय पर्याय नाही सध्या परीस्थीती कोरोना आजार आणि दुसरीकडे दुष्काळी परस्थिती आहे त्यामुळे लवकरात लवकर परवानगी मिळावी व परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची व त्यांच्या  कारभाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी. अशी मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समिती चे जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ रोड़े, उपाध्यक्ष आकाश भाऊ वाबळे, कार्याध्यक्ष विकास शेठ झावरे यांनी जिलाधिकारी अ,नगर उपविभागिय नाशिक,यांना निवेदनव्दारे व ई-मेल द्वारे केली आहे.
⇛ स्वतःचा विहिरीत पाणी असून देखील पाइप लाईनला परवानगी भेटली नसल्याने सध्या पिण्याच्या पाण्यासाठी आमच्या कुटुंबाची वाताहत होत असून शेतीला देखील पाणी नसल्याने उभे पिके जळून चालली आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा असून कर्जाची परतफेड करायची कशी हा मोठा प्रश्न आमच्या समोर असून प्रशासनाकडून कुठलेच सहकार्य होत नाही. आम्हाला तातडीने परवानगी मिळावी व सदर परवानगी आताच मिळाली पाहिजे जेणेकरून उन्हाळ्यात शेतात कुठलेही पिके नसल्याने खोदकाम करता येईल. पावसाळ्यात परवानगी मिळाल्यास इतरांच्या शेतातून उभ्या पिकातून पाइप लाईन नेता येणार नाही.         सागर निंभोरे - तक्रारदार शेतकरी
 तक्रारदार शेतकऱ्याने श्रीगोंदे तहसील कार्यालयात अर्ज देऊन ६ महिने झाले तरी देखील परवानगी देनेस अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून टाळाटाळ होत आहे. सदर अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. व अन्यायग्रस्त शेतकऱ्याला लगेच परवानगी देऊन न्याय मिळावा.
अरुण रोडे - जिल्हाध्यक्ष अन्याय निर्मूलन सेवा समिती.

Post a Comment

0 Comments