सर्व धनगर समाजाच्या वतीने शेंडगे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची मागणी
रोख ठोक न्यूज:-राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या धनगर समाजाच्या 2 जागा जून च्या पहील्या आठवड्यात रिक्त होत आहेत. या जागेवर धनगर समाजासाठी झटत असणाऱ्या इंजिनिअर डी. आर शेंडगे यांची वर्णी लागावी म्हणून धनगर समाजाच्या वतीने प्रयत्न होत आहेत. धनगर समाजाच्या वतीने शेंडगे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची मागणी केली जात आहे.
विधानपरीषदेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये या जागेसाठी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना संधी मिळणार आहे. इंजि.डी.आर.शेंडगे हे मेकॅनिकल इंजिनिअर व एम. बी.ए. मार्केटिंग असुन, 30 वर्ष औद्योगिक अनुभव आहे. औद्योगिक क्षेत्रात त्यांचे प्रदूषण विषयावर संशोधन महत्त्वाचे व मानवी हिताचे आहे. तसेच रेल्वे ट्रॅक हायजीन वर ही त्यांचे संशोधन चालू आहे. हे काम करत असताना सामाजिक क्षेत्रात सम्राट चंद्रगुप्त फाऊंडेशन च्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले आहे. तसेच मोठा जण समुदाय उभा केला आहे. धनगर समाज व मेंढपाळांसाठी वेगवेगळ्या सरकारी योजना व निधी आणण्याचे काम ते करत आहेत .एक अभ्यासू व कर्तबगार म्हणून त्यांची ख्याती आहे. धनगर समाज व मेंढपाळ बांधवांचे प्रश्न व उपाय यावर माजी कृषी मंत्री तथा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे बरोबर 29 डिसेंबर 2019 रोजी सविस्तर चर्चा केली असुन पवार साहेब यांनी त्यांच्या अभ्यासु पणाची दखल घेतली आहे. व शेंडगे त्यांच्या संपर्का मध्ये आहत. त्यांना विधानपरिषद मिळाल्यास एक तळमळीचा आमदार व राज्यात झंझावात निर्माण करून धनगर समाज बरोबर आणणारा धनगर नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ला मिळु शकतो हे निश्चित व पवार साहेब ही संधी निश्चित देतील. असा विश्वास धनगर समाजाला आहे.

0 Comments