रोख ठोक न्यूज :-
कोरोना सारख्या गंभीर आजाराने जगभर थैमान घातले असून त्यासाठी प्रशासनाच्या वतीने स्थानिक पातळीवर आरोग्य सेविकांच्या मार्फत नागरिकांना मार्गदर्शन व उपाययोजना करण्याची जबाबदारी दिली आहे. परंतु पारनेर तालुक्यामध्ये आरोग्य सेविका नेमून दिलेल्या मुख्यालयी हजरच नसल्याच्या प्रकार अन्याय निर्मूलन सेवा समितीने उघड केला असून मुख्यालयी हजर न राहणाऱ्या आरोग्य सेविकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदन मार्फत जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन सर्वोतपरी काम करत आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या आरोग्याबाबत बारीक लक्ष ठेवून त्यांना योग्य ती मदत मिळवून देण्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेविका यांच्यावर आहे. पारनेर तालुक्यातील तिखोल व धोत्रे बु. येथे आरोग्य उपकेंद्र आहे. तिखोल हे गाव डोंगरदऱ्यांमध्ये असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तिखोलमध्ये आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे धोत्रे बु. येथे आदिवासी समाज जास्त असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता शासनाच्यावतीने आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोरोणा सारख्या आजाराने जगभर थैमान घातले असताना आरोग्य सेविकांनी मुख्यालयी थांबने बंधकारक असून, नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व सल्ला देणे गरजेचे आहे. परंतु या दोन्ही उपकेंद्रावरील आरोग्यसेविका मुख्यालयी हजर राहत नसल्याचे अन्याय निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांच्या लक्षात आले. नागरिकांच्या आरोग्याबाबत लक्ष वेधण्यासाठी रोडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून मुख्यालयी हजर न राहता शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आरोग्य सेविकांची चौकशी करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
तीखोल व धोत्रे बू येथील उपकेंद्रे हे दुर्गम व आदिवासी लोकवस्तीच्या भाग आहे. येथील नागरिकांना आरोग्य सेवा तत्काळ मिळावी म्हणून शासनाने येथे उपकेंद्र सुरू केले परंतु येथे आरोग्य सेविका हजर राहत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहत आहे. रात्री - अपरात्री एखाद्या महिलेच्या प्रसूतीसाठी उपकेंद्रात जाण्याची वेळ आली तर तेथे आरोग्य सेविका उपलब्ध नसतात त्यामुळे हे आरोग्य उपकेंद्र शोभेची वस्तू बनली आहे. कामाच्या ठिकाणी हजर न राहणाऱ्या आरोग्य सेविकांची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.अरुण रोडे जिल्हाध्यक्ष अन्याय निर्मूलन सेवा समिती.

0 Comments