उद्धव ठाकरे यांची एकूण संपत्ती किती?

रोख ठोक न्यूज:-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती याविषयी अनेकांना उत्सुकता होती. विधान परिषदेचा अर्ज भरताना आज ते शपथपत्र सादर करतील आणि त्यात खुलासा होईल अशी बहुतेकांना कल्पना होती.
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचा खुलासा केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपला व्यवसाय सर्व्हिस असा दिला. उद्धव ठाकरेंची एकूण जंगम मालमत्ता 24 कोटी 14 लाख इतकी आहे.कॅश इन हॅंड, बँक डिपॉझिट्स, शेअर्स, बाँड्स, फंड्स - 21 कोटी 68 लाखविमा पॉलिसी, दागिने हे सर्व मिळून त्यांची मालमत्ता 24 कोटी 14 लाख आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नावावर वाहन नाही.
उद्धव यांची स्थावर मालमत्ता 52 कोटी 54 लाख आहे.
उद्धव यांनी 1986 ते 1988 दरम्यान रायगड जिल्ह्यात 5 प्लॉट्स घेतले होते त्याची किंमत 95,000 आहे.
एका जागेवर त्यांचं फॉर्महाऊस आहे त्याची किंमत 5 कोटी रुपये आहे.
अहमदनगर आणि माहीममध्ये प्लॉट्स त्यांची एकूण किंमत - 4 कोटी 20 लाख इतकी आहे. त्यावर बांधकामानंतर त्या जागेची किंमत - 13 कोटी 64 लाख इतकी आहे.
त्यांच्या बांद्रा इस्ट आणि बांद्रा वेस्ट या रहिवासी जागांची एकूण किंमत 33 कोटी 73 लाख इतकी आहे. उद्धव यांच्या नावावर असलेली स्थावर मालमत्ता 52 कोटी 44 लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर एचडीएफसी बॅंकेचं 4 कोटी रुपयाचं कर्ज आहे.
उद्धव यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 65 कोटींची आहे. रश्मी ठाकरे यांच्या उत्पन्नाचं साधन बिझनेस आहे. उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे स्रोत वेतन, डिव्हिडंड फंड आणि कॅपिटल गेन हे आहेत.
उद्धव ठाकरेंविरुद्ध 23 केसेस पेंडिंग आहेत, पण दोषी एकातही नाही.
आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती?
विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी शपथपत्र सादर केलं होतं. त्यात त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 16 कोटी रुपये इतकी आहे असं सांगितलं होतं.
आदित्य ठाकरे यांच्याकडे 13 हजार 344 रुपये रोख रक्कम आहे. आदित्य ठाकरेंच्या बँकांमधील वेगवेगळ्या ठेवींची किंमत 10 कोटी 36 लाख इतकी आहे.
आदित्य ठाकरेंकडे जवळपास 64 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मालकीची एक BMW कारही आहे. या गाडीची बाजारभावानं किंमत साडे सहा लाख रुपये आहे.

Post a Comment

0 Comments