रोख ठोक न्यूज:-
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखिल ही निवडणूक लढणार आहेत. यामुळे ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी महत्वाची ठरणार आहे. या ९ जागांसाठी १० उमेदवार घोषित केल्याने तिढा वाढला होता. यावर काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
दरम्यान,विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच महाविकास आघाडी ५ जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगीतले. महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

0 Comments