निघोजला सुलाखेवाडीतील दोन हातभट्टयांवर छापे....


 रोख ठोक न्यूज :-

 
पारनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई करत निघोज येथील सुलाखेवाडीत रात्री  एक, तर सकाळी एक अशा दोन  गावठी दारूभट्टयांवर छापे टाकून त्या  ऊध्वस्त केल्या. पारनेर पोलिसांच्या या धाडसी कारवाईबाबत पारनेर तालुक्यातून पोलिसांचे कौतुक होत आहे.

कुकडी कालवा पट्ट्यातील ही  दहावी भट्टी आहे. या कारवाईत पो.हावालदार अशोक निकम झापो कॉ  रविंद्र पाचारणे,दत्ता चौगुले, नरसिंग शेलार होमगार्ड वैभव गोगडे, सत्यजित शिंदे यांनी भाग घेतला.तयार केलेली दारु , कच्चे रसायन , दारू पाडण्याचे साहीत्य पोलिसांनी नष्ट करून पंचनामा केला. विशाल राजु पुजारी वय २०   या दारू भट्टी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या हातभट्टीचा मालक सोन्याबापु धारासिंग गव्हाणे हा पळून गेला.गावठी दारूच्या अनेक भट्टया कुकडी नदीलगत काटवनात आहेत . पारनेरचे पोलिस निरिक्षक
राजेश गवळी  यांना  लोकजागृती सामाजिक संस्थेने  या दारूभट्यांची चालु असल्याची माहीती दिल्यानंतर  त्यांनी पोलिस उपनिरिक्षक विजयकुमार बोत्रे यांचे पथक पाठवून तातडीने या कारवाया केल्या.
       लॉक डाऊन मुळे शासनाची दारू दुकाने बंद असल्यामुळे गावठी दारूला मोठी मागणी वाढली आहे. चारशे ते पाचशे रूपये लिटर प्रमाणे गावठी दारूची विक्री होत आहे, त्यामुळे गावठी दारुच्या धंद्यांना तेजीचे दिवस आलेले आहेत  परंतु  त्यातुन एकमेंकांच्या संपर्कामुळे रोगाचा  कोरोना या भयंकर रोगाचा प्रसार वाढण्याचा त्यामुळे धोका निर्माण
झाला आहे., तसेच या दारूमुळे पांगरमल सारखे दारूकांड प्रकरण पुन्हा होवू शकते. कोरोना रोगाच्या उपाययोजना म्हणुन लावण्यात आलेल्या विषेश कलमांकारवाई झालेल्या जामीन मिळणार नाही .
दारू प्रकरणात पहिल्यांदा जामीनास कोर्टाचा नकार 
या कारवाईतील आरोपीला आज प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता त्याचा जामीन न्यायालयाने नाकारला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर भा.दं.वि कलम ३२८, २६९ , २७०, १८८ मुबंई दारूबंदी कायदा ६५ फ, क, ड, ई, सह कोविड २०१९ उपाय योजना ( विषेश कलम) लावण्यात आले आहे. सदर गून्हे दखलपात्र व बिनजामीनी असुन सत्र न्यायालयाकडे चालतात. यापुढे सर्रासपणे दारू निर्मात्यांवर व विक्रेत्यांवर या कलमांतर्गत कारवाईची मागणी होत आहे.
गावठी दारू विक्री किंवा हातभट्टीची निर्मितीविषयी माहीती ग्रामस्थांनी पोलिसांना ( 02488 221533)किंवा लोकजागृती सामाजिक संस्थेला (9850096123)
कळवावी. माहीती देणाऱ्याचे नाव
पुर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments