रोख ठोक न्यूज :-
पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या मित्र परिवाराकडून लोकवर्गणीतून सांगवी सूर्या व जवळा येथील परप्रांतीय ५० गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आला.लॉक डाऊन मुळे कंपन्या व खाजगी कामे बंद आहेत. त्यामुळे कंपन्यांचे व खाजगी कामगार शेतमजूर यांचे एक वेळ खाण्याचे वांधे निर्माण झाले आहे. अनेक कामगार यांची उपासमार होत असल्याचे डॉ श्रीकांत पठारे यांच्या लक्षात आले. जवळा येथील धर्मनाथ विद्यालयातील निवारा केंद्राला व सांगवी सूर्या येथील निवारा केंद्राला भेट देऊन विचारपूस केली. डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने सामाजिक जाणिवेतून लोकवर्गणीतून जवळा येथील परप्रांतीय मजुरांच्या २६ कुटुंबांना व सांगवी सूर्या येथील २४ कुटुंबांना असा ५० परप्रांतीय कामगार मजुरांच्या कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा किराणा वाटप करण्यात आला.
यावेळी प्रमोद पठारे,किसनराव रासकर,मंगेश पाटील सालके,ईश्वर आढाव,पत्रकार सतीश रासकर,राजेंद्र पठारे, तसेच ग्रामस्थ हजर होते. ग्रामस्थांच्या वतीने डॉ.पठारे यांचे आभार मानण्यात आले.
0 Comments