रोख ठोक न्यूज:-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये महाराष्ट्रासह सर्व राज्यांना आर्थिक पॅकेज द्या आणि केंद्राला द्यायचा 10 हजार 500 कोटी रुपयांचा हप्ता दोन वर्ष पुढे ढकलण्याची मागणी पवारांनी केली आहे.
सध्याच्या कर्ज घेण्याच्या मर्यादेनुसार राज्य 92 हजार कोटीपर्यंत कर्ज घेऊ शकते, त्यापैकी 2020-21 च्या भांडवली खर्चाच्या गरजा भागवण्यासाठी 54 हजार कोटींची योजना आखली गेली आहे. प्रस्तावित खर्च टिकवण्यासाठी राज्याला १ लाख कोटींच्या तुटीचा सामना करावा लागणार आहे, हे स्पष्ट असल्याचं पवारांनी पत्रात लिहिलं आहे.
एफआरबीएम’ किंवा वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कर्ज घेण्याची मर्यादा वाढवून अधिक कर्ज घेणे, हे एक धोरण आखले जाऊ शकते. परंतु फक्त कर्ज घेऊन संपूर्ण तूट भरुन काढल्यास, राज्य कर्जाच्या डोंगराखाली अडकण्याची भीती पवारांनी व्यक्त केली.
दरम्यान, अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा जवळपास सर्वच देशांनी जीडीपीच्या जवळपास दहा टक्के आर्थिक पॅकेजेस जाहीर केली आहेत. अशाप्रकारे, आरबीआयसह भारत सरकारकडून राज्यांना योग्य आर्थिक पॅकेज देण्याची तयारी केली जाऊ शकते, असं पवारांनी सुचवलं आहे.

0 Comments