बाजारभाव नसल्याने दुध व्यवसाय अडचणीत,४० रूपये बाजारभाव मिळावा- शेतकऱ्यांची मागणी


रोख ठोक न्यूज:-  सुपा / प्रतिनिधी शरद रसाळ
   पारनेर तालुक्यातील सुपा जिरायती पट्ट्यात शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुध व्यवसायाला प्राधान्य दिले आहे.मात्र गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळात दुधाच्या बाजारात कमालीची घट झाल्याने दुध व्यवसाय अडचणीत सापडला आहे.दुधाला किमान ४० रूपये बाजारभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
     महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनामुळे लाकडाऊन असताना या गंभीर परिस्थीतीमध्ये जिवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दूधाला खासगी दूध संस्था व दूध डेअरीवाल्याकडून २० ते २२ रूपये प्रति लीटर इतका कमी बाजारभाव मिळत आहे. या रकमेतून मुलभूत खर्चही भागविणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे. राज्यात लॉकडाऊन होण्याआधी शेतकऱ्यांच्या दूधाला साधारणत: ३० ते ३५ रूपये बाजारभाव मिळत होता. मात्र ग्राहकांना आजही पुर्वीच्याच दरानुसार दूध दिले जात आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना प्रति लीटर १२ ते १५ रूपये नुकसान सोसावे लागत आहे. त्यातच पशुखाद्याच्या किंमती शेंगदाणा पेंड- २२५०,भुसा-११९०,सरकी-१९५०,मिल्क मोर-१२८० आदींचे बाजारभाव गगनाला भिडले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात अडकत चालला आहे. यावर शासनाने तातडीने योग्य उपाय योजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
     सुपा परीसरातील शेती पुर्णतःहा पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी दुध व्यवसायाला प्राधान्य दिले आहे.नोकरी मिळत नसल्यामुळे तरूण वर्ग कर्ज काढून मोठ्या प्रमाणात पशुधन खरेदी करून या व्यवसायाकडे वळाला आहे.गेल्या वर्षी भिषण दुष्काळ परीस्थीती निर्माण झाली असताना
छावणीच्या माध्यमातून तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन वाचवले.निसर्ग साथ देत नसल्याने चालू वर्षी कडबा (वैरण) बाजारभाव भडकले आहेत.हिरवा चारा उपलब्ध नसल्याने उसाला ३५०० ते ४००० रूपये प्रतिटन मोजावे लागतात.एकंदरीत खुराक चारा आदींचा खर्च पहाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच काहीच शिल्लक रहात नाही.दुधाला किमान ४० रूपये बाजारभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
 
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय करणे कठीण झाले आहे, गेल्या वर्षी पाणी नसल्यामुळे कोणतेही पिक घेता आले नाही.चालू वर्षी समाधान कारक पाऊस झाला.शेतात कांदा, बटाटा,वटाणा,भेंटी,गवार आदींसह कलींगड, टरबुज या सारखे उत्पन्नाचे पिक घेतले.मात्र शेतात माल उपलब्ध असून कोरोना सारख्या महामारीमुळे विकता येत नाही.व त्याला बाजारभाव मिळत नाही.दुध व्यवसायातून कुटुंबाला थोडाफार हातभार मिळत होता परंतु दुधाचे बाजार कमी झाल्याने व आंबवणाचे बाजार वाढवल्यामुळे दुध व्यवसाय करणे कठीण झाले आहे.- संजय आप्पासाहेब मुंगसे, पशुपालक कडुस,ता.पारनेर.

Post a Comment

0 Comments