शेतकऱ्यांच्या दुधाला ५ रू अनुदान द्यावे - सुशांत कांदळकर

रोख ठोक न्यूज 

शेतकऱ्यांच्या दूधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर जाहीर करण्यात यावा नाहीतर किमान लिटरमागे ५ रूपये अनुदान देण्यात यावे ही मागणी सुशांत कांदळकर यांनी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे आपणास निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनामुळे लाॅकडाऊन असताना या गंभीर परिस्थीतीमध्ये जिवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दूधाला खासगी दूध संस्था व दूध डेअरीला २० ते २२ रूपये प्रति लीटर इतका कमी भाव मिळत आहे. या रकमेतून मुलभूत खर्चही भागविणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाऊन होण्याआधी शेतकऱ्यांच्या दूधाला साधारणत: ३० ते ३२ रूपये भाव मिळत होता. मात्र ग्राहकांना आजही पुर्वीच्याच दरानुसार दूध दिले जात आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना प्रति लीटर १० ते १२ रूपये नुकसान सोसावे लागत आहे. त्यातच पशुखाद्याच्या किंमती वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात अडकत चालला आहे. यावर शासनाने तातडीने योग्य उपाय योजना करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

याशिवाय पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून जनावरे आजारी पडल्यास त्यावर पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या माध्यमातून त्यावर उपचार करण्यात यावे शेतकऱ्यांच्या जिवनाशी निगडीत विषयांत गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूधाला किमान ३० रूपये प्रति लीटर भाव जाहीर करावा नाहीतर ५रूपये लिटरमागे अनुदान देण्यात यावे अशी विंनती सुशांत कांदळकर यांनी केली आहे.
                       
                       

Post a Comment

0 Comments