लॉक डाऊन मुळे अडकलेल्या कामगारांना मायभूमीत पाठवून दिलासा द्या....

शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.

रोख ठोक न्यूज :-

   कोरेना रोगामुळे  अचानक लॉकडाउन सुरु झाले. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात कामानिमित्ताने आलेला कामगार त्याजागीच अडकून पडला आहे. आता लॉकडाउन ला जवळजवळ ४० दिवस उलटून गेल्याने कामगारांना घराची ओढ लागल्याचे चित्र यानिमित्ताने रस्त्यावर दिसत आहे. अनेक कामगार रस्त्याने पायपीट करत ४००-५०० किलोमीटर आपल्या गावी जाण्यासाठी निघाला आहे. त्याचा सयम सुटत चालला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कामगारांना त्यांच्या मायभूमीत पाठवण्याची व्यवस्था करून दिलासा द्यावा अशी मागणी शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
     ज्याप्रमाणे ऊसतोडणी कामगार असतील विदयार्थी असतील याबाबतीत ज्याप्रमाणे निर्णय शासनाने घेतला त्याचप्रमाणे निर्णय कामगारांच्या बाबतीत व्हावा अशी मागणी कामगार राज्यमंत्री नामदार मा. बच्चूभाऊ कडु यांना करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री जिल्हाअधिकारी यानाहि निवेदन देण्यात आले.
   
    निवेदनावर शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे,राजु लाळगे,शंकर वरखडे,प्रितेश पानमंद,गणेश लंके,विश्वास शेटे,नवनाथ बरशिले,दत्ता टोनगे,मंगेश मुळे,जयराम सरडे,सचिन कोतकर,सुरज शिरसाट,योगेश गागरे,अक्षय मगर,निलेश दरेकर,पाडळे शांताराम,रामा सुपेकर,युवराज बढे,नवनाथ लामखडे,नवशाद पठाण,वाळुंज राजेंद्र,नागेश नरसाळे,मच्छिंद्रनाथ लाळगे,नितीन तराळ,राहुल शेटे,शैलेश ढवळे,निलेश वरखडे,निलेश लामखडे,स्वप्नील लामखडे,खंडु लामखडे,अवि लामखडे,विशाल लामखडे,अंकुश वरखडे,डेरे भिमाजी,घुले शेखर,शिंदे किरण,नितीन तराळ आदि सहकार्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments