ऑनलाइन शिक्षणासंबंधी केंद्राने मागवल्या सूचना

रोख -ठोक न्यूज़

     देशातील लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. शाळा व महाविद्यालये व विद्यापीठे किमान ३ मेपर्यंत बंद राहणार आहेत. यानंतरही परिस्थितीनुसार शैक्षणिक संस्था सुरू करणार की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. परंतु केंद्र सरकारने या कालावधीत ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यास सांगितले आहे.

देशभरात शाळा-विद्यापीठांपर्यंतचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेतले जात आहेत. यामध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. देशातील ऑनलाइन शिक्षण कसे अधिक चांगले करता येईल याविषयी केंद्र सरकारने सर्वांकडून सूचना मागविल्या आहेत.

केंद्र सरकारने यासाठी एक मोहिम सुरू केली आहे. 'भारत पढे ऑनलाईन' असे या मोहिमेचे नाव आहे. ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया सुधारण्याबाबत काही सूचना असल्यास त्या केंद्र सरकारकडे पाठवा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. यासाठी आपल्याकडे आता फक्त काही तास शिल्लक आहेत. सूचना पाठविण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२० आहे.

कशा पाठवायच्या सूचना?
सूचना दोन प्रकारे पाठवता येतील. प्रथम ट्विटरद्वारे. आपल्याकडे ट्विटर खाते असल्यास, फक्त लॉगिन करा आणि ट्विट करा. आपण आपली सूचना लिहून #BharatPadheOnline हा हॅशटॅग त्या ट्विटमध्ये ठेवायचा आहे तसेच ते टि्वट @HRDMinistry व @DrRPNishank या अकांउट्सना टॅग करायचे आहे.

दुसरा मार्ग म्हणजे ईमेल. आपण आपल्या सूचना ईमेलमार्फत थेट सरकारला पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमची सूचना bharatpadheonline.mhrd@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायची आहे.

Post a Comment

0 Comments