झेंडू फुलांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने निघोजच्या शेतकऱ्याने एक एकर झेंडू नांगरून टाकला

१ लाख रुपयांचे नुकसान

रोख ठोक न्यूज पारनेर

         कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे व बाजारपेठा बंद असल्यामुळे झेंडूची फुले तोडण्यासाठी आलेल्या झेंडूची एक एकर शेती नांगरून टाकण्याची वेळ निघोज येथील शेतकरी कुशाबा भागाजी कवाद यांच्यावर आली आहे.
           कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यावर उपाययोजना म्हणून संचार बंदीचे व लॉक डाऊन चे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यामुळे बाजारपेठा, उद्योगधंदे थंडावले होते. पुण्या-मुंबईसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी स्वतःहून बाजारपेठा बंद ठेवल्याने झेंडू सारखी फुले विकायची कुठे ? असा प्रश्न झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर पडला आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून पाण्याचा तुटवडा असताना देखील शेतकऱ्यांनी झेंडू लागवड केली. आता झेंडू फुले तोडायला आले असून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे सध्या हातातोंडाशी आलेला घास निघून चालला असल्याचे दुःख शेतकऱ्याच्या समोर आहे.
          निघोज येथील तुकाई मळा येथील शेतकरी कुशाबा भागाजी कवाद या शेतकऱ्याची एक एकर मध्ये झेंडूची शेती होती. ठिबक द्वारे उत्तम प्रकारे ही बाग फुलवली होती. यापूर्वी २ वेळा फुले देखील तोडली परंतु तोडलेली फुले बाजार पेठे पर्यंत नेताच आला नसल्याने या शेतकऱ्याने ही फुले फेकून दिली. आता  झेंडू ची फुले सध्या तोडण्यावाचून चालली असून बाजारपेठा बंद असल्याने त्यांना विकायची कुठे ? हा प्रश्न त्यांना सतावत असल्याने त्यांनी एक एकर वरील झेंडू शेती टॅक्टरच्या साहाय्याने नांगरून रोटारून टाकले आहे. कुशाबा कवाद यांचे सुमारे  १ लाखांचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने मदत मिळावी अशी मागणी परिसरातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
लॉक डाऊन मुळे बाजारपेठ  उपलब्ध होत नसल्याने निघोज येथील शेतकरी कुशाबा भागूजी कवाद या शेतकऱ्याने एक एकर वरील झेंडू ची शेती नांगरून टाकली. छाया - चंद्रकांत कदम



Post a Comment

0 Comments