जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके व आर.सी.जी. ग्रुपच्या माध्यमातून घरोघरी मोफत भाजीपाला वाटप,युवा नेते प्रकाश गुंड यांचा स्तुत्य उपक्रम
रोख ठोक न्यूज - शरद रसाळ सुपा
संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व या जैविक युद्धाला शह देण्यासाठी संचारबंदी लागू असताना प्रत्येक कुटुंबाला घरात बसून राहण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. मूलभूत सेवासुविधा चालू असल्या तरीही रोजगार नसल्या कारणाने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.पारनेर नगर तालुक्याचे आमदार निलेश लंके हे स्वतःआपल्या जीवाची पर्वा न करता या कोरोनो रोगा संदर्भात जनजागृती करण्यासाठी व प्रशासकीय अटी व नियमांचे पालन करण्यासाठी गावोगावी जनप्रबोधन करताना दिसून येत आहे. संपूर्ण मतदारसंघात स्वतः लक्ष देऊन निर्जंतुकी करणाची फवारणी करत आहेत.
![]() |
बाबुर्डी ता.पारनेर येथील आर.सी.जी. ग्रुपच्या माध्यमातून घरोघरी मोफत भाजीपाला वाटप करताना जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, अध्यक्ष प्रकाश गुंड.(छाया-शरद रसाळ, सुपा)
आमदार निलेशजी लंके संपूर्ण मतदार संघातील कोणतीही गरीब व्यक्ती उपाशी झोपणार नाही याची काळजी घेत असताना तालुक्यातील कोणतीही व्यक्ती उपाशी झोपणार नाही याकडे लक्ष केंद्रित करा असे आदेश प्रतिष्ठानसह कार्यकर्त्यांना दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पारनेर तालुक्यातील बाबूर्डी गावातील राजे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गुंड यांच्या मार्गदर्शना खाली आणि जिल्हा परिषद सदस्या व आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या सौभाग्यवती राणिताई लंके यांच्या उपस्थितीत गावातील घरोघरी सुमारे ४०० कुटुंबांना मोफत भाजीपाला देण्यात आला.
आपण सर्वांची मदत करू शकत नाही, पण सर्वजण कोणाची न कोणाची तरी मदत करू शकतात. कोरोना रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत लोकांना रोजगार नाही. लोकांना भाजीपाला उपलब्ध होत नाही. हे लक्षात आल्यानंतर आर सी जी ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश गुंड व ग्रुपच्या सभासदांनी संपूर्ण गावात घरोघरी जाऊन भाजीपाला वाटप केला.या सामाजिक उपक्रमा मागील उद्देश फक्त गरजू लोकांना मदत करण्याचा नसून या संकटाच्या काळात देणाऱ्यांचे अधिक हात पुढे यावे हा आहे.असे युवा नेते प्रकाश गुंड, रमेश गवळी व अवधूत गवळी यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक उपक्रमास योगदान देण्यासाठी गणेश दिवटे,बाबू गवळी,आतिश साबळे, आकाश आरखडे, प्रतिक गारकर, अजय बोडरे,लखन गवळी,सूरज गवळी, किसन शिंदे,देवा दिवटे,ओंकार दिवटे, आमोल भोंडवे, सागर गवळी, सिद्धार्थ काकडे, ऋषिकेश गाडगे,लाला भोंडवे,किरण गुंड, किशोर लगड, अमोल दिवटे, श्रीकांत जगताप, दादा लगड,संदीप जगताप,रमेश दिवटे, गणेश ठुबे,गोरख दिवटे, संदीप ठुबे, अतिश साबळे, बाबासाहेब ठुबे, बाळासाहेब गारकर, आकाश आरखडे, एकनाथ जगताप, मारूती गवळी या सर्व तरुण सहकाऱ्यांनी या सामाजिक समाजोपयोगी उपक्रमास सहकार्य केले.

0 Comments