आज सकाळपर्यंत पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्यापैकी ३९ अहवाल प्राप्त झाले. असून त्यात एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.नगर तालुक्यातील आलमगीर येथील एका ३१ वर्षीय तरुणाला कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानेही बाधा झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.प्राप्त अहवालापैकी उर्वरित ३८ व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
0 Comments