कडुसमध्ये ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटप
ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार
रोख ठोक न्यूज सुपा(शरद रसाळ)
पारनेर तालुक्यातील कडुसमध्ये कोरोना व्हायरस (कोविड-१९) विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच मिना मुंगसे, कामगार तलाठी संतोष मांडगे, ग्रामविकास अधिकारी आश्लेषा ताजवे, डॉ. सैदाने, पप्पू शेख, नारायण नरवडे, आशा मुंगसे व आशा सेविका उज्ज्वला रमणसिंग आदी उपस्थित होते.डॉ. सैदाने यांनी कोरोना व्हायरसपासून बचाव कसा करता येईल व त्यासाठी उपाययोजनांबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले.
ग्रामिण भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.यामध्ये सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मेन चौक, बस स्थानक, किराणा दुकान परीसर, ओटे, शाळा, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे.
शहरी भागात कोरोना रूग्णांचे प्रमाण जास्त असल्याने या आजारामुळे गावातील ग्रामस्थांचे संरक्षण व्हावे यासाठी सरपंच मिना मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
कोरोना या महाभयंकर महामारीने जिल्ह्यात रुद्र रूप धारण केले आहे. एक रूग्ण उपचार होउन घरी सोडला तर दुसरा रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहे.जिल्ह्यात शनिवारी सायंकाळ पर्यंत १८ रूग्ण आढळून आले आहेत. या आजारामुळे जिल्ह्यातील चिंता वाढली आहे.प्रशासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोना या महाभयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर कडुस ग्रामपंचायत राबवत असलेल्या या समाजाभिमुख उपक्रमांचे ग्रमस्थांनी कौतुक केले आहे.
ग्रामस्थांनी अनखी सहकार्य करावे !
गावातील कधी न खंडीत होणारा ग्रामदैवताचा यात्रा उत्सव या वर्षी या महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला.यादरम्यान ग्रामस्थांचे प्रशासनासह ग्रामपंचायतीला मोलाचे सहकार्य लाभले आहे.या कठीण काळात ग्रामस्थांनी घरात थांबून अनखी सहकार्य करावे.-मिना मुंगसे, सरपंच कडुस ता.पारनेर.
![]() |
कडुस ता.पारनेर ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप करताना सरपंच मिना मुंगसे, तलाठी संतोष मांडगे, ग्रामविकास अधिकारी आश्लेषा ताजवे व इतर.
(छाया- शरद रसाळ, सुपा)
|

0 Comments