कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी जलसेनमध्ये उपाययोजना
प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याचे ग्रामपंचायत कडून आवाहन
रोख ठोक न्यूज पिंपरी जलसेन
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून नुकतेच निघोज येथे कोरोना संशयित आढळला असून परिसरात खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी जलसेन येथे कडक उपाययोजना करण्यात आल्या असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पिंपरी जलसेन ग्रामपंचायत कडून करण्यात आले आहे.
पिंपरी जलसेन येथे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत अनेक कठोर निर्णय घेण्यात आले आहे. गावामधील किराणा दुकाने सकाळी आठ ते अकरा व संध्याकाळी पाच ते सात या वेळेत उघडे राहतील, गावातील व वाड्या-वस्त्यांवर क्रिकेट, पत्ते जुगार व इतर खेळ खेळण्यास बंदी आहे. व चारपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास सुद्धा बंदी आहे, गावामध्ये गावाबाहेरील अनेक शेतकरी व व्यापारी भाजीपाला विक्री घेऊन येत आहेत त्यामुळे गावाबाहेरील भाजीपाला विक्री गावांमध्ये बंदी आहे. फक्त गावांमध्ये गावातील शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीस मान्यता आहे, गावातील पतसंस्थेमध्ये विनाकारण कोणीही बसू नये, गावामध्ये विनाकारण कोणी फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, गावामध्ये पोहण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे गावात व इतरत्र कुठेही पाहायला जाऊ नये.
प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून ग्रामपंचायत व प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन ग्रामपंचायत वतीने करण्यात आले.

0 Comments