मुख्यमंत्र्यांनी शेतकरी,ग्राहकांच्या जीवनाशी खेळणार्यांवर कठोर कार्यवाही करावी, शरद पवळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
रोख ठोक न्यूज सुपा

जगभरासह आपल्या देशात कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने थैमान घातले असता राज्य,केंद्र सरकारसह प्रशासकीय अधिकारी यामध्ये व्यस्त असताना किराणा दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजारी करुन,नफेखोरांमुळे होणारी भाववाढ नागरिकांना जीवघेणी ठरत आहे आज प्रत्येक दुकानांसमोर अधिकृत बाजारभावाचे फलक लावणे सक्तीचे करावे,कंपनीचे नाव,वस्तुचे नाव व वस्तुचे दर असणारी बिले ग्राहकांना देण्यास सक्ती करावी,शालेय विद्यार्थी व्यसनी बनु नये म्हणुन किराणा दुकानांसह,खाद्यपदिर्थांची विक्री करणार्या प्रत्येक दुकानांमध्ये तंबाखुजन्य पदार्थ आढल्यास दुकानांची परवानगी रद्द करावी,शेतकर्याचा कवडीमोल किमतीने विकलेला माल पाचपट किमतीने त्याच्याबरोबर ग्राहकांना घ्यावा लागतोय यातील भ्रष्टाचार थांबवा,आज कोरानाच्या लढ्यात बळीराजा सर्वजन लाॅकडाउनमध्ये घरी असताना उनातान्हात जीवाची पर्वा नकरता शेताच्या कामांबरोबर गोपालनाचे काम करत आहे आज त्याचा शेतमाल शेतात पडुन आहे फळ विकली जात नाही फळबागा उद्धवस्त झाल्यात दुधाचा प्रश्नही तसाच आहे. कोरोनापेक्षाही मोठा लढा आज त्याला द्यावा लागत आहे यासाठी वरील सर्व प्रश्नांच गंभीर स्वरुप समोर आल्याचे पाहुन मला अशा परिस्थितीत आंदोलन करणे शक्य नसल्याकारणाने मी माझ्या गावी नारायणगव्हाणमध्ये दि.०३एप्रिल २०२०पासुन मौन व्रत धारण केले आहे तरी मुख्यमंत्री आपण नक्कीच याप्रश्नावर लवकरात लवकर न्याय देताल ही अपेक्षा नव्हे तर विश्वास आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातुन व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन पिकवलेला शेतमाल कवडीमोल किमतीने खरेदी केला जातोय आज व्यापारी कंपनी,डिलर होलसेलर दुकानदार यांच्या साखळीलाच याचा फायदा होतांना दिसतोय शेतकरी त्याचा विकलेला शेतमाल ग्राहकाबरोबर त्याला पाचपट रकेमेने खरेदी करतोय यावर नियंत्रण यायला हवे कष्टाचा मोबदला हमीभावाच्या रुपाने मिळाला तर बळीराजा कर्ज देणारा बनेल त्याचबरोबर भ्रष्टाचार थांबला तर ग्राहकांची लुट होणार नाही यासाठी नागरिकांनीच महात्मा गांधीच्या मिठाच्या सत्याग्रहाप्रमाणे जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीविरोधात चळवळ उभारावी - शरद पवळे, सामाजिक कार्यकर्ते.
0 Comments