कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरदवाडी व परीसातील लॉक डाऊन वाढवा - सरपंच विलास कर्डिले यांची मागणी

रांजणगाव रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे सरदवाडी व परिसरातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी औद्योगिक वसाहतीमुळे सरदवाडी व परिसरातील लॉकडाऊन वाढवा

सरदवाडीचे सरपंच विलास कर्डिले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रोख ठोक न्यूज शिरूर (प्रतिनिधी सुदर्शन दरेकर)


      सरदवाडी ( शिरूर) हा परिसर रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या लगत असल्याने व नगर- पुणे महामार्गावर येत असल्याने रोज अनेक कामगार व गाड्यांची ये जा या रस्त्याने सुरू असते. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन केले आहे. तरी महामार्ग व औद्योगिक वसाहती मुळे भविष्यात सरदवाडी (तालुका शिरूर) ग्रामपंचायत हद्दीतील लॉक डाऊन वाढवण्याची मागणी सरदवाडीचे सरपंच विलास मारुती कर्डिले यांनी मुख्यमत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
         कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू आहे. प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे आदेशाप्रमाणे सरदवाडी गावामध्ये संपूर्ण लॉक डाऊन केले आहे. तसेच सरदवाडी हे गाव पुणे-नगर महामार्गावरील व रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीला लागून असल्यामुळे भविष्यात या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 14 एप्रिल पर्यंत असणारे लॉक डाऊन मध्ये आणखी वाढ करण्यात यावी अशी मागणी सरदवाडी गावचे सरपंच विलास कर्डिले यांनी केले आहे. सदर मागणीचे पत्र त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार शिरूर व प्रशासनास पाठवले आहे.

Post a Comment

0 Comments