जी एस महानगर बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कडून कोरोना लढाईसाठी मुख्यमंत्री फंडासाठी पावणे आठ लाखांची मदत
रोख ठोक न्यूज पिंपरी जलसेन
जीएस महानगर को-ऑपरेटिव बँक लिमिटेड यांच्यावतीने सर्व कर्मचारी वर्गाचा मार्च महिन्याच्या पगारातील एक दिवसाचा पगार कोरोना बधितांसाठी सहाय्यता निधी म्हणून मुख्यमंत्री फंडासाठी देण्यात आला आहे. सुमारे ७ लाख ७१ हजार ७११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. ही मदत जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
कोरोना (कोव्हिड१९) विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभरासह सर्वत्र धुमाकूळ घातला असून त्याची खबरदारी म्हणून प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत. देशावर आलेल्या संकटावर आपण सर्वांनी मात करायला पाहिजे. सरकारने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. प्रशासकीय अधिकारी डॉक्टर,बँक कर्मचारी आपल्या जीवाची तमा न बाळगता आपल्या साठी काम करत आहेत. आपण घरात रहा सुरक्षित रहा. व प्रशासनाला सहकार्य करा. कोरणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावरील उपाययोजनांसाठी सध्या आर्थिक मदतीची आवश्यकता असून अनेक सामाजिक संस्था आर्थिक मदतीसाठी हात पुढे करत आहेत. अजूनही समाजातील दानशूरांनी या लढाई मधून आपल्या जनतेला वाचवण्यासाठी सढळ हाताने आर्थिक मदत करावी असे आवाहन जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी केले आहे.

0 Comments