कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राळेगण थेरपाळ येथे खबरदारी

राळेगण थेरपाळ मध्ये सोशल डिस्टन्स ठेवून स्वस्त धान्य वाटप

नागरिकांकडून प्रशासनाच्या सूचनांचे होतेय पालन

रोख ठोक न्यूज पारनेर

        कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व नागरिकांना रेशन देण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या असून राळेगण थेरपाळ येथे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत सोशल डिस्टन्स ठेऊन स्वस्त धान्याचे वाटप करण्यात आले.
       यावेळी सरपंच पंकज कारखिले व स्वस्त धान्य पुरवठादार गंगाधर बेंडाले यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कोरोना विषाणूच्या बचावासाठी सर्वांनी घरात राहणे, सुरक्षित राहणे, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, बाहेर पडताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे. वारंवार सनी टायझर हात धुणे, बाबाजी लोकांशी संपर्क टाळणे आदी उपायोजना ग्रामस्थांना समजावून सांगितले.
         स्वस्त धान्य दुकान अंतर्गत धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्स ठेवून धान्य वाटप सुरळीतपणे करण्यात आले. यावेळेस सर्वांनी मास्क चा वापर केला. अतिशय नियोजनबद्ध व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून हे धान्य वाटप करण्यात आले.
सोशल डिस्टन्स ठेवून राळेगण थेरपाळ येथील ग्रामस्थांना धान्य वाटप करण्यात आले. (छाया- चंद्रकांत कदम)



Post a Comment

0 Comments