संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात संचारबंदीचे होतेय पालन

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात देखील लॉकडाउनचे तंतोतंत केले जातेय पालन 

रोख ठोक न्यूज संगमनेर (हुसेन पटेल)

 सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. तसेच भारत देशात देखील या कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. या कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी खबरदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देशात २१ दिवसासाठी लॉकडाउन ची घोषणा केली. व घरात रहा सुरक्षित रहा असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुषंगाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील तंतोतंत संचारबंदी चे पालन  करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
      शहरी भागात पोलीस प्रशासना तर्फे लॉक डाऊन पाळले जात आहे की नाही यावर  करडी नजर ठेवली जात आहे. अत्यावश्यक  सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्यावर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. मात्र ग्रामीण भागात पोलीस प्रशासन कमी पडत असल्यामुळे संगमनेर तालुक्यातील खांडगाव मध्ये काही युवकांनी एकत्र येत आपल्या गावाची जबाबदारी आपली समजून आपल्या गावात या कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊ नये म्हणून या युवकांकडून गावात येणाऱ्या - जाणाऱ्याची कसून चौकशी केली जात आहे व आपल्या गावातून विनाकारण कोणताही व्यक्ती बाहेर फिरकनार नाही याची काळजी घेतली जात आहे.

       खांडगाव गावचे सरपंच सौ. संगीता गुंजाळ, उप सरपंच श्री. राहुल गुंजाळ,  ग्रामसेवक श्री. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवक : सद्दाम शेख, मंगेश गुंजाळ, बशीर शेख, दगु रुपवते, विठ्ठल खरे, विलास सानप, दीपक गुंजाळ  हे आपल्या गावासाठी कर्तव्य बजावत आहे.
खांडगाव (ता. संगमनेर) येथील तरुणांनी कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावाच्या हद्दीवर थांबून येणाऱ्या - जाणाऱ्यांची कसून चौकशी करत आहेत. छाया - हुसेन पटेल, संगमनेर.

 

Post a Comment

0 Comments