रोख ठोक न्यूज पिंपरी जलसेन
दिवसेंदिवस कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शाळांना देखील सुट्ट्या दिली असल्याने पिंपरि जल्सेन जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शालेय पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. सोशल डिस्टसिंग वापरून पालकांना आहाराचे वितरण करण्यात आले.कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीने १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जाहीर केले असून. सर्वांना घरात रहा, सुरक्षित रहा. असे आवाहन करण्यात आले आहे. शाळांना देखील सुट्ट्या दिल्या असल्याने पिंपरी जलसेन जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकांनी नियोजनाप्रमाणे उत्तम सहकार्य करत एक मेकांमध्ये एक एक मीटरचे अंतर ठेवून पोषण आहार घेतला. शाळेच्या वतीने पोषण आहारामध्ये तांदूळ व कडधान्य यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री रा या औटी, शिक्षक भास्कर औटी, मल्हारी रेपाळे, जयप्रकाश साठे, सतीश भालेकर, शिक्षिका रत्नमाला नरवडे, नंदा वाढवणे, पालक राजेंद्र थोरात, माजी सरपंच वर्षा थोरात, उपसरपंच संदीप काळे, दिनेश शेळके, कैलास घेमुड, भाऊसाहेब पानमंद, पत्रकार चंद्रकांत कदम, संदीप अडसरे आदी उपस्थित होते.
सॅनिटायझरचा वापर करून पालकांनी केला शाळेत प्रवेश
स्वतःची, कुटुंबाची काळजी घेत पालकांनी सोशल डीस्टांसिंग ठेवत शाळेत प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर केला. पालकांच्या या सतर्कतेबद्दल शिक्षकांनी कौतुक केले. घरात रहा, सुरक्षित रहा. असे आवाहन देखील शिक्षकांनी पालकांना केले आहे.
![]() |
| पिंपरी जलसेन येथे जिल्हा परिषद शाळेकडून शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.छाया - चंद्रकांत कदम. |

0 Comments