शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विनंती.
रोख ठोक न्यूज पारनेर
भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पोलिसांनी सहकार्य करावे. अनेक शेतकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार काहि ठरावीक पोलिसांकडून होत आहे. हा चुकिचा प्रकार आहे. हा थांबविण्यासाठी वरिष्ठ नी यात लक्ष घालावे अशी मागणी शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
आज देश लॉकडाउन असताना संपूर्ण देशाला अन्नपुरवठा करण्याची जबाबदारी शेतकरी राजावर येउन पडली आहे. अन तो या रोगाला न भिता काबाडकष्ट करून भाजीपाला पुरवण्याचे काम करत आहे. त्यांना सहकार्य करायचे सोडून काहि पोलिस त्यांच्याकडून पैसे उकळत आहे. हे प्रकार त्वरित थांबवावे. व शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम प्रशासनाकडुन व्हावे विनंती देखील शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
सबंधित प्रकार थांबले नाहि तर हा प्रकार शेतकरी नेते नामदार मा. बच्चूभाऊ कडु व पोलिस अधिक्षक यांना व जिल्हाअध्यक्ष विनोदजी परदेशी यांना यासंदर्भात पुराव्यासह माहिती शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती शिवबा संघटना संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे व प्रितेश पानमंद यानी दिली.

0 Comments