कोरोनामुळे शिरूर मधील वीटभट्टी मजुरांचे जेवणाचे हाल; शिरूर तालुका पत्रकार संघाच्या पुढाकारातून प्रशासनाकडून ब्रिटानिया कंपनीच्या वतीने २०० मजुरांच्या जेवणाची केली व्यवस्था

रोखठोक  न्यूज शिरूर

शिरूर शहरासह तालुक्यातील जवळ जवळ दोनशे वीटभट्टी इतर मजुरांचे हाताला काम नसल्यामुळे जेवनाचे हाल होत असल्याबाबत काही नागरीकांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मा.तालुकाध्यक्ष संतोष शिंदे व सचिव अर्जुन बढे यांच्याशी संपर्क केल्यानंतर पत्रकार संघाचे संस्थापक संजयजी भोकरे,राज्य अध्यक्ष वसंतजी मुंडे,राज्यसरचिटणीस विश्वासराव आरोटे व जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचे नायब तहसिलदार श्रीशैल व्हट्टे यांच्याशी संपर्क करून या मजुरांची जेवनाची व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे सांगिल्यानंतर त्यांनी शिरूरच्या तहसिलदार लैला शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मजुरांची जेवनाची व्यवस्था करण्याबाबत रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीतील ब्रिटानीया कंपनीकडुन या दोनशे मजुरांच्या जेवनाची व्यवस्था करून दिल्यामुळे या मजुरांच्यावतीने समाधान व्यक्त करून मा.तहसिलदार लैला शेख,निवासी नायब तहसिलदार श्रीशैल व्हट्टे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मा.तालुकाध्यक्ष संतोष शिंदे,सचिव अर्जुन बढे व कंपनीचे आभार व्यक्त करत आहे.त्याचबरोबर शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याबाबत नागरीकांमधुनही या सामाजिक उपक्रमाचे काैतुक केले जात आहे.
सध्याच्या परीस्थितीत अनेक जण अशा प्रकारची मदत करत आहेत त्यांचे देखील पत्रकार संघाच्यावतीने आभार मानण्यात आले.
शिरूर व परिसरातील सुमारे २०० वीटभट्टी मजुरांना ब्रिटानिया कंपनीकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. (छाया - अर्जुन बढे)

Post a Comment

0 Comments